आयनोडे हेवाळे सरपंच अपात्र ;जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी यांचा आदेश

सुहास देसाई :- ग्रामपंचायत हेवाळे आयनोडे या पंचायतीच्या जून 2019 मध्ये झालेल्या ग्रा प पोटनिवडणुकीत सरपंच व सदस्य म्हणून अनुसूचित जाती महिला या आरक्षित पदावरून श्रीम अश्विनी सुभाष जाधव ह्या निवडून आल्या होत्या त्यांनी जात पडताळणी साठी निवडणुकीनंतर 12 महिन्याची मुदत देऊनही विहित नमुन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने पदाचा कालावधी संपायला चार दिवस बाकी असताना सरपंच व सदस्य पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे याबाबतचे आदेश नुकतेच जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिले आहे

याच बरोबर कुडासे ग्रा प सदस्य श्री शेर्लेकर अभिजित राजन हेही जात वैधता वेळीच सादर न केल्याने सदस्य म्हणून अपात्र झाले आहे त्यामुळे कुडासे गावातही सदस्य म्हणून निवडून येऊन अपात्र ठरण्याचा प्रकार घडला आहे

दोडामार्ग तालुक्यातील स्मार्ट ठरलेली आयनोडे हेवाळे ग्रामपंचायतीत उपसरपंच हे सरपंच पदाचा कार्यभार सांभाळत होते त्याच कालावधीत विविध पुरस्कार व ग्रामपंचायतीने नावलौकिक मिळविला होता त्यामुळे सदर ग्रामपंचायत राजकीय पक्ष यांना प्रतिष्ठेची होती या पंचायतीत सरपंच पद आरक्षित असल्याने एक जागा अनुसूचित जाती महिला रिक्त होती हया प्रवर्गातून आरक्षित जागेसाठी जून 2019 मध्ये पोट निवडणूक झाली होती सदर पोट निवडणुकीत शिवसेनेने आपला उमेदवार उभा करून निवडून आणले होते त्यानंतर प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सरपंच निवडणूकित श्रीम अश्विनी सुभाष जाधव ह्यानी सरपंच म्हणून कार्यभार स्वीकारला होता

जाहिरात4