टिळकांच्या मुळगावीही करण्यात आले लोकमान्यांच्या स्मृतींना अभिवादन !

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील चिखलगाव हे लोकमान्य टिळकांचे मुळगाव! येथेही लोकमान्य टिळकांची पुण्यतिथीदिनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. लोकमान्य टिळकांच्या बऱ्याच पिढ्या चिखल गावात खोटी सांभाळत होत्या. मात्र लोकमान्यांच्या वडिलांनी शिक्षण खात्यात नोकरी धरली आणि कामानिमित्त ते रत्नागिरीमध्ये आले आणि येथेच त्यांचा जन्म झाला. आज रत्नागिरीत लोकमान्यांचे स्मारक उभे आहे. तर चिखलगावानेही लोकमान्यांच्या स्मृती जतन केल्या आहेत.

१८८९ मध्ये लोकमान्य टिळक चिखलगाव येथे आले होते. तर १८९४ मध्ये दापोली न्यायालयात झालेल्या वाटपाच्या एका दाव्यात टिळकांना सामील प्रतिवादी व्हावे लागले होते असे काही संदर्भ इतिहासामध्ये सापडतात असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

जाहिरात4