सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा सरचिटणीस पदी मधुसूदन बांदिवडेकर !

जाहिरात-2

फोंडाघाट —सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस पदी फोंडाघाट गावचे सुपुत्र मधुसूदन बांदिवडेकर यांच्या नियुक्तीचे पत्र माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांचे हस्ते कुडाळ येथील कार्यक्रमात त्यांना प्रदान फोंडाघाट सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस पदी फोंडाघाट गावचे सुपुत्र मधुसूदन बांदिवडेकर यांना नियुक्तीचे पत्र माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांचे हस्ते कुडाळ येथील कार्यक्रमात त्यांना प्रदान करण्यात आले.

यावेळी भाजपा सिंधुदुर्ग अध्यक्ष राजन तेली आणि जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. 1990 पासून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून विविध जबाबदाऱ्या निभावताना बांदिवडेकर यांनी आपल्यातील नेतृत्व गुणांची छाप पाडली. कणकवली पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष यासारखी महत्त्वाची पदे त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या नियुक्तीमुळे फोंडाघाट मित्रपरिवार व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला..

जाहिरात4