चाकरमानी मोठ्या संख्येने सिंधुदुर्गात ; खारेपाटण येथे पहिल्याच दिवशी व्यवस्थेचा फज्जा

जाहिरात-2

पहिल्या दिवशी फक्त 3 रॅपिड टेस्ट

कणकवली | संतोष राऊळ :
कणकवली खारेपाटण येथे आजच्या पहिल्या दिवशी चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली.होम क्वारंटाईनचे चिक्के,थरमल गन ने टेम्प्रेचर चेकिंग आणि आदेश पत्र घेण्यासाठी दीड ते दोन कोलोमोटर पर्यंत रांगा लागल्या होत्या.त्यामुळे प्रशासनाने लावलेले दोन काउंटर अपुरेच पडले आहेत.तब्बल चार ते पाच तास या प्रक्रियेसाठी थांबून राहावे लागले असल्याने चाकरमानी आणि पथकातील कर्मचारी यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली.पथकातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याने दिवसभरात आरोग्य आणि महसूल कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा भांडणे झाली.या पुढच्या सात दिवसात येणाऱ्या चाकरमान्यांना गणेशोत्सवात सहभागी होता येणार आहे त्यामुळे ५ ते ७ ऑगस्टपर्यंत रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान आज दिवसभरात 2880 चाकरमान्यांनी सिंधुदुर्ग जिल्हयात प्रवेश केला तर फक्त तीन लोकांचे स्वब रॅपिड टेस्ट साठी घेण्यात आले.जिल्हा प्रशासनाने आज खारेपाटण, फोंडा,करूळ आणि आंबोली या ठिकाणी पथके नियुक्त करून गरज भासल्यास रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला मात्र ही व्यवस्था तुटपुंजीच ठरली.लोकांची गर्दी आणि नियुक्त केलेली पथके यांचा मेळ बसला नाही.आजूनही पथके खारेपाटण प्रवेश द्वारावर नेमणे गरजेचे आहे.त्याच प्रमाणे सुखनदीच्या पलीकडे राजापूरच्या दिशेने लांबच लांब रांगा लागतात त्या ठिकाणी शौछालये उभारण्याची गरज आहे.ती नसल्याने महिलांनची फारच गैरसोय झाली.तर एकाच वेळी काउंटरवर गर्दी केल्याने सोशल डिस्टन्स चा फज्जा उडाला.

जाहिरात4