एसटीच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला मंजुरी; २८ हजार कर्मचारी योजनेच्या कक्षेत

जाहिरात-2

मुंबई (प्रतिनिधी) : तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या एसटी महामंडळाचे लॉकडाऊनच्या काळात आर्थिक गणित बिघडले. एसटीने खर्च कमी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एसटी महामंडळाचा जास्त खर्च डिझेल आणि कर्मचाºयांच्या वेतनावर होतो. या खचार्ची बचत करण्यासाठी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने स्वेच्छानिवृत्ती योजनेला मंजुरी दिली. त्यामुळे या योजनेत एसटी महामंडळाच्या २८ हजार कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त होऊ शकतील. या योजनेमुळे दर महिन्याला १०० कोटी रुपये वेतन खर्चापोटी बचत होणार आहे.

सध्या एसटी महामंडळात एकूण १ लाख ३ हजार कर्मचाºयांपैकी २८ हजार कर्मचारी ५० वर्षांपेक्षा पुढील वयाचे आहेत. त्यामुळे एसटी महामंडळात स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्वेच्छानिवृत्ती योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. स्वेच्छानिवृत्ती योजना वय वर्षे ५० व त्यापेक्षा जास्त वयाच्या एसटी कर्मचारी व अधिकारी यांना लागू होणार आहे. एसटी महामंडळात निवृत्ती वय ५८ वर्ष आहे. एसटी महामंडळाच्या २८ हजार कर्मचारी व अधिकाºयांना या योजनेचा लाभ होणार आहे. त्यासाठी त्यांना उर्वरित प्रत्येक वर्षासाठी ३ महिन्याचे वेतन मूळ (वेतन+महागाई भत्ता) देण्यात येणार आहे.

जाहिरात4