चाकूचा धाक दाखऊन देवगड शहरात भर दिवसा महिलेला लुटले : एक लाख तीस हजाराचे दागिने काढून घेतले

जाहिरात-2

देवगड  :-  देवगड शहरातील एका महिलेशी फोनवर संपर्क साधून तिचे अश्लील फोटो काढून धमकी देवून बोलावून घेवून गाडीतुन नेवून वाडातर येथे निर्जनस्थळी चाकूचा धाक दाखवून अंगावरील दागीने लुटून पुन्हा तिच्याशी अश्लील वर्तन केल्याची घटना देवगड शहरात घडली असून या घटनेने देवगडमध्ये खळबळ उडाली आहे.पोलिसांनी याप्रकरणी मुख्य सुत्रधार असलेल्या देवगडमधीलच प्रसाद सुभाष खडपकर व त्याला सहाय्य करणारा पडवणे येथील विनोद विलास जुवाटकर यांना ताब्यात घेतले आहे.दोघांनाही न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडीत महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये संशयित प्रसाद सुभाष खडपकर(४०) रा.देवगड यांनी महिलेची ओळख करून अश्लिल फोटो माझ्याकडे आहेत.मी सांगीतल्यानंतर ते पाठविले नाहीस तर नवèयाला सांगेन अशी धमकी दिली व दि. ३१ जुलै रोजी सकाळी ११ वा.सुमारास देवगड शहरातील एका रस्त्यावर बोलावून घेवून तिला लाल रंगाच्या गाडीमध्ये बसवून वाडातर पुलानजिक निर्जन स्थळी नेले.तेथे दुसरा संशयित विनोद विलास जुवाटकर(३०) रा.पडवणे याला गाडीत बसविले.त्यांनी महिलेच्या गळ्याला चाकू लावून गळ्यातील चैन, मंगळसूत्र, बांगड्या, कानातील कुडी काढून घेतले.तिच्या हातातील पाकीटही काढून घेतले.त्या पाकीटामधून स्टेट बँक ऑफ शाखा देवगड एटीएम् कार्ड व ग्रीन कार्ड, युनियन बँक एटीएम् कार्ड व बँक ऑफ इंडिया एटीएम् कार्ड जबरीने काढून घेतले.
यावेळी प्रसाद खडपकर यांनी बाहेर येवून स्त्री मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले अशी तक्रार दिली.या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी प्रसाद सुभाष खडपकर व विनोद विलास जुवाटकर यांच्याविरूध्द भादवि कलम ३९२, ३८४, ३५४, ३५४ब, ३६५, ५०० व आयटी अ‍ॅक्ट ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली.त्यांना १ ऑगस्ट रोजी देवगड न्यायालयासमोर हजर केले.न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

संशयितांनी पीडीत महिलेला चाकूचा धाक दाखवून २५ हजार रूपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ५० हजार रूपये किमतीची २० ग्रॅमची सोन्याची चैन, ५० हजार रूपये किमतीच्या दोन प्रत्येकी १० ग्रॅम वजनाच्या सोन्याचा बांगड्या, ५ हजार रूपये किमतीच्या दोन सोन्याचा कुड्या काढून घेतल्या.एकूण १ लाख ३० हजाराचा ऐवज लांबविला व एटीएम् कार्ड काढून घेतली.देवगडमध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून या घटनेचा अधिक तपास स.पो.निरिक्षक संजय कातिवले करीत आहेत.

जाहिरात4