खरेदी-विक्री संघासाठी शासकीय भुखंड मिळावा : जिल्हाधिकारी यांना प्रमोद रावराणे यांचे निवेदन.

जाहिरात-2

वैभववाडी । नरेंद्र कोलते
वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघासाठी शहरातील शासकीय भूखंड विनामूल्य मिळावा. या मागणीचे निवेदन संघाचे व्हा. चेअरमन प्रमोद रावराणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सूफुर्द केले आहे.
34 वर्षांपूर्वी सहकार क्षेत्रातील कै. आ.सु. रावराणे, कै. यशवंतराव रावराणे यांनी या संघाची निर्मिती केली. जिल्ह्याच्या अन्य संघाच्या तुलनेत हा संघ सक्षम, कार्यक्षम व कर्जमुक्त आहे. तालुक्‍यातील 25 सेवा सोसायटी, जिल्हा बँक व संघ सभासदांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे, शेतीची अवजारे, सर्व प्रकारची खते, कीटकनाशके, पशु खाद्य पोचविण्याचा संघाचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. तसेच शासकीय भात खरेदी संघामार्फत गावागावात जाऊन केली जात आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे. या शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांच्या बांधावर खत व अन्य सेवा दिली जात आहे. या संघाकडे शेतकऱ्यांचा माल खरेदी, विक्री व साठवणुकीसाठी मुबलक जागा नाही. तरी वाभवे भूमापन क्र. 40/ब/3 पैकी पाच गुंठे भूखंड शिखर संस्था असलेल्या या संघाला विनामूल्य मिळावा. असे निवेदनात प्रमोद रावराणे यांनी म्हटले आहे.

जाहिरात4