वेंगुर्लेत भाजप महिला मोर्चातर्फे होणार अनोखे रक्षाबंधन

जाहिरात-2

रक्षाबंधना निमित्त कोवीड योद्ध्यांचा राखी बांधून व सन्मानपत्र देऊन होणार सन्मान

वेंगुर्ले | प्रतिनिधी
भाजप महिला मोर्चातर्फे सोमवार 3 ऑगस्ट रोजी वेंगुर्ले तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदार संघात तसेच वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीत एकाच वेळी रक्षाबंधनाच्या दिवशी कोवीड योद्ध्यांना राखी बांधून व सन्मानपत्र देऊन अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन कार्यक्रम होणार असल्याची माहिती महिला तालुकाध्यक्षा सौ.स्मिता दामले यांनी दिली.
वेंगुर्ले भाजप तालुका कार्यालयात आयोजित महिला कार्यकारणी मध्ये या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तालुक्यातील जि. प.मतदार संघनीहाय राख्या व प्रशस्तीपत्रक सुपूर्द करण्यात आले. तसेच तालुक्यातील डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेवीका, अॅबुलन्स ड्रायव्हर, पोलिस, सफाई कर्मचारी, रेशनींग दुकानदार तसेच कोरोनाच्या महामारीत ज्यांनी प्रत्यक्षात काम केले अशा कोवीड योद्ध्यांना राखी बांधून तसेच सन्मानपत्र देऊन रक्षाबंधन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हाचिटनीस अॅड. सुषमा खानोलकर, जिल्हा चिटनीस पुनम जाधव, माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे, जि.महिला सरचिटणीस सारीका काळसेकर, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, नगरसेविका क्रुपा मोंडकर, वेतोरे सरपंचा राधिका गावडे, तुळस ग्राम.सदस्या श्रद्धा गोरे, मोचेमाड माजी सरपंचा रसिका गावडे, आरवली महिला अध्यक्षा रीमा मेस्त्री, रेडी महिला शक्ती केंद्र प्रमुख श्रद्धा धुरी, व्रुंदा गवंडळकर, उभादांडाची शांती केळुसकर, परबवाडा येथील अंकीता देसाई, वेतोरे ग्रा.प.सदस्या यशश्री नाईक, महिला जि.का.का.सदस्या कीर्ती मंगल भगत, वेंगुर्ले शहराच्या आकांक्षा परब व मानसी परब इत्यादी उपस्थित होते.
या बैठकीस रेडी जि. प.सदस्य प्रीतेश राऊळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, जि.का.का.सदस्य बाळा सावंत, मच्छिमार नेते दादा केळुसकर, शक्ती केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर केळजी व नाथा मडवळ, बाळु प्रभु, पुंडलिक हळदणकर उपस्थित होते.

जाहिरात4