तुम्हाला इकडे पाठवले कोणी? आरोग्य सेविकेला दमदाटी

जाहिरात-2
अडखळ जुईकर मोहल्यातील प्रकार; जमावाविरोधात गुन्हा दाखल

दापोली । प्रतिनिधी

दापोली तालुक्यात अडखळ जुईकर मोहल्ला येथे आरोग्य महिला सेविका असलेल्या कर्मचाऱ्याजवळ गैरवर्तन केल्याबद्दल आरोग्य कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत. गुरुवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

दरम्यान याप्रकरणी आरोग्य सेविकेने दापोली पोलीसंकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी दुपारी झालेल्या एका बैठकीत संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई न झाल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

३० जुलै रोजी गुरुवारी दुपारच्या सुमारास गावातील काही इसमांनी एकत्र घेराव घालून त्यांना तुम्ही कोण? तुम्हाला इकडे पाठवले कोणी? पाठवले त्यांचे नाव सांगा? अशी अर्वाच्य भाषेत विचारणा करून भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांकडुन संताप व्यक्त होत आहे. कोव्हीड-१९ व सारी या आजाराच्या पार्श्वभूमीवर अडखळ जुईकर मोहल्ला येथे सर्व्हे करण्यासाठी गेल्या होत्या यावेळी त्यांना वाटेत थांबवून उलट सुलट प्रश्न विचारून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

तालुक्यात आरोग्य यंत्रणा आहे त्या परिस्थितीत काम करण्याचा प्रयत्न आहेत,मात्र हा दुर्दैवी संतापजनक प्रकाराचा सर्व स्तरावर याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकाराची एक व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली असून पोलिसांकडेही क्लिप गेली आहे. पोलीस हेड कॉन्सटेबल श्री.कांबळे अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी प्रभारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र देऊन चर्चा केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने विलंब झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. भा. द.वि. विरोधात १४३ /३४१ /५०४/१८८८ या कलमानुसार जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात4