नेमळेतील समीर धावडे आत्महत्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

जाहिरात-2

सावंतवाडी | प्रतिनिधी
झाराप पत्रादेवी बायपासलगत असलेल्या डोंगरीवर १९ जुलै रोजी नेमळे एरंडवाक येथील समीर बाळकृष्ण धावडे (वय २९) या युवकाने गळफास लावून आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर त्याचा भाऊ एकनाथ धावडे याने सावंतवाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मृत समीर धावडे याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवि कलम 306 अन्वये नेमळेतील दत्तात्रय नाईक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय नाईक याने पैसे देण्यास तगादा लावल्यामुळे मानसिक दबावात येऊन त्याने आत्महत्या केल्याचा संशय मृत समीरचा भाऊ एकनाथने पोलिसांकडे व्यक्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्‍णासो बाबर करीत आहेत. याबाबतची माहिती ठाणे अंमलदार पाडगावकर यांनी दिली आहे.

जाहिरात4