खेड : बोरज पाठोपाठ कशेडी घाटातही ओढ्यात रसायन ओतले

जाहिरात-2

खेड | प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गा वरील बोरज नाल्यात एका अज्ञात चालकाने रसायन ओतून परिसरातील पाणी दुषित केल्याने जलचर प्राणी मृत होऊन ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असताना याच प्रकाराची पुनरावृत्ती मुंबई गोवा महामार्गा वरील कशेडी घाटात शुक्रवारी घडून नैसर्गिक ओढ्यात ज्वालाग्राही रसायन सोडल्यामुळे मासे मृत होऊन पाणी दूषित बनल्याने येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

पाणी दूषित होऊन जलचर प्राणी मृत झाल्याचा प्रकार शुक्रवारी येथील काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. त्यांनी या बाबत पोलीस स्थानक, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या कडे तक्रार केली आहे. दोन दिवसांपूर्वी बोरज नाल्यात असाच प्रकार घडला होता. त्या प्रकरणात अद्यापी कोणाला अटक करण्यात आलेली नाही. तर त्या पाठोपाठ दुसरा प्रकार घडल्याने नैसर्गिक जलस्त्रोत असलेले ओढे नाले मात्र असुरक्षित होऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र गंभीर बनत आहे.

जाहिरात4