अंतिम वर्षांच्या परीक्षा की सरासरी गुण? सुप्रीम कोर्टात १० ऑगस्टला सुनावणी

जाहिरात-2

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे यावर्षी देशातील अनेक विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. दरम्यान, अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात की न घ्याव्यात यावरून बराच खल झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.

दरम्यान, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालाने यावर सुनावणी करताना याबाबतची सुनावणी १० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका कायम असल्याने काही विद्यापीठे आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील सरकारांनी यावर्षी पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती.

तसेच यावर्षी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याची योजना आखली होती. मात्र यूजीसी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत आग्रही होती. तसेच सप्टेंबरनंतर परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे यूजीसीने सांगितले आहे.

जाहिरात4