राम मंदिराचा प्रसाद जगभर वाटणार, अयोध्येत १ लाख ११ हजार लाडूंची तयारी

जाहिरात-2

लखनऊ (वृत्तसंस्था) : अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. यासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. राम मंदिराच्या पूजेसाठी मणिराम दास यांच्या छावणीकडून तब्बल १ लाख ११ हजार लाडू तयार केले जात आहेत. हे तयार करण्यात येणारे लाडू दुतावासांमार्फत जगभारत पाठवले जाणार आहेत. अयोध्येत लाडू नैवेद्य आणि प्रसाद वाटण्यासाठी १ लाख ११ हजार लाडू तयार करण्यात येत आहे, असे तेथील एका सेवकाने सांगितले.

हे तयार करण्यात येणारे लाडू जगभरात, मठ-मंदिरात पाठवले जाणार आहे. या लाडूंचे नैवेद्य दाखवले जाईल. नैवेद्य दाखवल्यानंतर हे लाडू सर्व मठ-मंदिरात पाठवले जातील. तसेच येथील भक्तांमध्येही लाडू वाटले जाईल, असेही सेवकाने सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे भूमिपूजन करणार आहे. अयोध्येत ५०० वर्षांनी येणा-या या दिवसाला एक विशेष दिवस बनवण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून दिवाळीसारखे वातावरण तयार करण्यात येत आहे.

जाहिरात4