विराटला अटक करा; न्यायालयात याचिका दाखल

जाहिरात-2

चेन्नई (वृत्तसंस्था) : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला अटक करण्यात यावी अशी एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विराट आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना यांना अटक करण्यात यावी अशी मागणी याचिकाकत्यार्ने केली आहे. ऑनलाइन गॅम्बलिंगची (जुगाराची) जाहिरात हे दोनही अभिनेते करत असून अशा प्रकारांनी जुगाराला प्रोत्साहन दिले जात असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

चेन्नईस्थित एका वकिलाने ही याचिका दाखल केली आहेत. विराट कोहली ऑनलाईन जुगाराची जाहिरात करत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. युवकांमध्ये या अ‍ॅपचे व्यसन वाढत चालले आहे. त्यामुळे या ऑनलाईन जुगार खेळण्याच्या सर्वच अ‍ॅपवर बंदी घालावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात केली आहे. तसेच विराट कोहली, तमन्ना हे सेलिब्रिटी अशा अ‍ॅप्सची जाहिरात करून तरूणांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे या दोघांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

याचिकाकर्त्याने या याचिकेत एका कर्जबाजारी तरुणाचा दाखला दिला आहे. एका तरूणाने या ऑनलाईन अ‍ॅपसाठी पैसे उसने घेतले होते. पण तो तरूण ते पैसे परत करू न शकल्याने त्याने आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा दाखला याचिकेत देण्यात आला आहे.

जाहिरात4