कलिका नागवेकर हिने पॉवर लिफ्टिंग खेळात वर्चस्व ठेऊन १०वी मिळवले ९१.५०टक्के

जाहिरात-2

रत्नागिरी । क्रीडा प्रतिनिधी

पॉवर लिफ्टिंग खेळामध्ये वर्चस्व राखून स्वतः च्या मेहनतीवर अभ्यास करून कलिका नागवेकर हिने आपले नाव मोठे केले आहे. जो आनंद १०वी पास झाल्यावर होतो तोच आनंद कलिका नरेंद्र नागवेकर हिला झाला आहे. फाटक हायस्कूलची विद्यार्थीअसलेली कलिका नरेंद्र नागवेकर हिने १०वी मध्ये ९१.५० टक्के गुण मिळवले. जेल रोड मध्ये राहणारी सर्व पंचक्रोशीतील लोकांनी तिचे कौतुक केले आहे.

तिचे वडील नरेंद्र नागवेकर, आई नम्रता नागवेकर, फाटक हायस्कुल मुख्याध्यापिका वायकुल मॅडम, शिक्षक टिकेकर मॅडम, आगाशे मॅडम, जोशी सर, सर्व शिक्षक, अंकिता पिलणकर व पॉवर लिफ्टिंग खेळाचे प्रशिक्षक राज नेवरेकर यांनी तिचे अभिनंदन केले आहे. अभुदय नगर व्यायाम शाळेत पॉवर लिफ्टिंगचे धडे घेऊन १० वी परीक्षेत चांगले मार्क कलिका हिने मिळवले आहे.

जाहिरात4