श्री केदारनाथ

जाहिरात-2

श्री केदारनाथ

महाद्रिपार्श्वे च तटे रमन्त सम्पुज्यमानं सततं मुनीन्द्रे: ।

सुरासुरैर्यक्ष महोरगाढयै: केदारमीशं शिवनेकमीडे ।।

ॐ केदारनाथ नमः

केदारनाथ हे भारताच्या उत्तराखंड राज्यामधील एक लहान गाव आहे केदारनाथ येथील अतिप्राचीन केदारनाथ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे भगवान शंकराचे केदारनाथ मंदिर भारतातील १२ ज्योतिर्लिंग पैकी एक असून ते हिंदू धर्मातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते .

कथा – या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेचा इतिहास हिमालया मधील केदार श्रुंग वर भगवान विष्णूंचे अवतार महातपस्वी नर आणि नारायण ऋषी तपस्या करत असत त्याच्या तपश्चर्या आराधना मुळे भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांच्या प्राथनेनुसार ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये राहण्याचे वरदान दिल हे स्थान केदारनाथ पर्वतराज हिमालयाच्या केदार नामक श्रुंगावर आहे .

पंचकेदारच्या कथेनुसार अस मानलं जातं महाभारतातील युद्धा मध्ये विजयी झाल्यावर पांडवांना भ्रातृहत्याच्या पापातून मुक्ती पाहिजे होती यासाठी भगवान शंकराचा त्यांना आशीर्वाद पाहिजे होता पण भगवान शंकर हे पांडवांवर नाराज होते . भगवान शंकराचे दर्शनासाठी पांडव काशी मध्ये गेले तेथे सुद्धा त्यांना दर्शन नाही मिळालं पण ते लोक त्यांना शोधत हिमालयात येऊन पोहोचले पण भगवान शंकर पांडवांना दर्शन देणार नव्हते यासाठी ते अंतर्धान होऊन केदारनाथ मध्ये जाऊन राहिले पण पांडवांना त्याचं दर्शन हव होत यासाठी ते त्यांच्या मागे केदारनाथला जाऊन पोहचले .

पण भगवान शंकरांनी तेव्हा बैलाचे रूप धारण केल आणि अन्य पशुपक्षी मध्ये जाऊन मिळाले पांडवांना संदेह झाला शेवटी भीम ने आपलं विशाल रूप धारण करून दोन पर्वतांमध्ये पाय पसरविले .इतर गाय बैल निघून गेले पण भगवान शंकर बैलाच्या रूपामध्ये होते ते भीमाच्या पायाखालून जाण्यास तयार नव्हते भीम ने शक्ती आणि बालाचा वापर करून बैलावर झपटे पण बैल भूमि मध्ये अंतर्धान व्हायला लागला तेव्हा भीमाने बैलाचा त्रिकोनात्मक पाठीचा भाग पकडला तेव्हा भगवान शंकर पांडवाच्या भक्तीला आणि दृढ संकल्पला बघून प्रसन्न झाले त्यांनी तत्काळ दर्शन देऊन पांडवांना पापातून मुक्त केले तेव्हा पासून भगवान शंकर बैलाची पाठच्या आकृतीनुसार पिंडच्या रूपामध्ये श्री केदारनाथ म्हणून पुजले जातात .

ऐतिहासिक माहिती – या परिसरास देवभूमी असे म्हटले जाते चारधामपैकी हे एक धाम असून या ठिकाणी बैलाची पाठ जेथे जमिनीबाहेर राहिली त्याजागी पांडवानी मंदिर बांधले या मंदिरामध्ये पुननिर्माण ८ व्या शतकात आद्य श्री शंकराचार्यांनी केले मुख्य मंदिराची निर्मिती ९ व्या शतकात झाली समुद्रासपाटी पासून बारा हजार फुट उंचीवरती हे मंदिर वसले आहे केदारनाथ गाव समुद्रसपाटी पासून ३५८३ मीटर उंचीवर हिमालयामध्ये मंदाकिनी नदीच्या काठावर वसले आहे गौरीकुंड ह्या गावा पर्यंतच वाहनाने प्रवास शक्य असून केदारनाथ ला पोहचण्यासाठी तेथून १४ किलोमीटर ८.४ मैल अंतर पायी वारीने पार करावे लागते .

मंदिराची रचना -बर्फाच्छादित पर्वतामधील एका उंच दगडी चौथऱ्यावर करड्या दगडी रंगाचे मंदिर असून चार दिशांना चार दरवाजे येथून हिमालयातील नंदादेवी , नंदाघुमटी , त्रिशूली , हतीपर्वत आदी शिखरे दिसतात .

हिमालयावर हरिद्वार , केदारनाथ १५० मैल आहे केदारनाथाचे देऊळ वैशाख ते आश्विन उघडे असते नंतर कार्तिक पासून चैत्रा पर्यंत ते बर्फात बुडालेले असल्यामुळे बंद असते .

मंत्र -ॐ नमः पार्याय चावार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च ।

नमस्तिथ्याय च कुल्याय च नमः शय्याय च फेन्याय च ।।

निळकंठ कुलकर्णी
8828615271

जाहिरात4