महामार्ग अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी धरले धारेवर;निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करा

जाहिरात-2

तीन तास बैठकीत नागरिकांनी व्यक्त केला संताप
संतोष राऊळ :- महामार्ग चौपदरीकरनाचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकाँनच्या कामाचा दर्जा फारच निकृष्ठ आहे.आज लोकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे असे असतांना ठेकेदार कंपनीला पाठीशी घालूनका.आताच ठेकेदारावर गुन्हा दाखल करा.अशी आग्रही भूमिका कणकवलीतील नागरिकांनी घेतली आहे. ठेकेदार कंपनीला वारंवार सूट दिल्या मुळेच आज ही स्थिती निर्माण झाली आहे.असे निकृष्ठ काम तुम्हा अधिकाऱ्यांना मान्य आहे काय.महामार्ग तांत्रिक एजन्सीचे या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे त्या मुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे.त्यामुळे ठेकेदार सोबत या एजन्सीला ही दिशी धरा आणि आता गुन्हा दाखल करा. भविष्यातील परिणाम गँभिर होतील असा इशारा नागरिकांनी दिला.यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे ,माजी आमदार परशुराम उपरकर आक्रमक होत मुद्दे मांडले.

कणकवली येथील महामार्ग चौपदरीकरनाच्या उड्डाण पुलाचा काही भाग स्लॅब घालतांना कोसळल्या नंतर नागरिकांची कणकवली तहसिलदार कार्यालय येथे महामार्ग अभियंता सलीम शेख यांच्या उपस्थितीत बैठक झाली.यावेळी तहसिलदार आर.जे.पवार,पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी,नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, अशोक करबळेकर,राजन दाभोलकर,बाळू मेस्त्री,दया मेस्त्री, महामार्ग अभियंता आर.बी.पवार, संजय मालांडकर,संदीप मेस्त्री,संदेश पटेल,स्वप्नील चिंदरकर,ऍड. विरेश नाईक,संतोष सावंत,नगरसेवक बंडू हर्णे, मिलिंद मेस्त्री आदींसह कणकवली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१३ जुलै रोजी बॉक्सवेल कोसळला त्या दिवसापासून तुम्ही ठेकेदाराला पाठीशी का घालता आहात. स्टक्चरल ऑडिट चा रिपोर्ट कुठे आहे.लोकांचे जीव गेल्यावर रिपोर्ट बाहेर काढणार काय असा सवाल यावेळी नागरिकांनी केला.मात्र या सर्व प्रश्नावर महामार्ग अभियंता सलीम शेख निरुउत्तर झाले.ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव मुख्य अभियंता याच्याकडे पाठवतो.असे सांगताच पुन्हा सर्वच अधिकाऱ्यांना नागरिकांनी धारेवर धरले…

जाहिरात4