विनायक राऊतांची टिव टिव!

विशेष संपादकीय | माधव कदम

 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जोरदार चपराक देवूनही राऊतांचे ‘गिर गया तो भी टांग उपर’

 प्रकल्पात खोडा घालाल तर कोकण वासिय तुमचेच खेटराने … करतील

 प्रकल्पाची मागणी, समर्थन, स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांकडूनही

 राऊतांकडून मर्यादा भंग : मुख्यमंत्र्यांचा मान राखा

उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्याने नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅन्ड पेट्रोकेमिकल प्रकल्पाचा फेर विचार करण्याचे घोषीत केल्यानंतर त्यांच्या या घोषणेचे समस्त कोकणवासियांनी जोरदार स्वागतच केले. कोणीही विरोधी सूर लावला नाही. मात्र शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंंत्र्यांच्या वक्तव्यावर टिव टिव करून मर्यादाभंग केला आहे. म्हणे स्थानिक जनता जोपर्यंत मागणी करत नाही, तोपर्यंत रिफायनरीचा पुर्नविचार नाही. मुळात मुख्यमंत्री या नात्याने उध्दव ठाकरे यांनी लोकमताचा कानोसा घेऊन लोकांनाच जर प्रकल्प हवा असेल आणि त्यातून राज्याचे हित साधणार असेल तर प्रकल्पाचा फेरविचार करू, रद्द झालेला करार पुन्हा करू आणि प्रकल्प उभारू असे स्पष्टपणे सांगितले असताना विनायक राऊतांच्या या टिव टिवीला कोण विचारतोय? परंतु राऊतांचे आपले प्रकल्प विरोधाचे तुणतुणे काही थांबलेले नाही. मुख्यमंत्र्याच्या मुलाखतीतील वक्तव्यांचा मतितार्थ खासदार असलेल्या लोकप्रतिनिधीला समजत नाही यावरून त्याच्या बुध्दीमत्तेचीच कीव करावीशी वाटते.

कोकणचे हीत, इथल्या बेरोजगारांना रोजगार आणि इथला सर्वांगिण आर्थिक विकास यासाठी प्रकल्पाला जोरदार समर्थन देणाºया स्थानिक कोकणवासियांना ‘दलाल’ संबोधणाºया खा. विनायक राऊत तुम्ही प्रकल्प विरोधाची ‘सुपारी’ कोणाकडून घेतली आहे काय? की कोकण आत्तापर्यंत राहीला तसाच मागासलेला ठेवून आपली स्वार्थाची पोळी तुम्ही आत्तापर्यंत जशी भाजलात तशी यापुढेही कोकण भकास ठेवून भाजायची आहे काय? परंतु आता जागृत व डोळस झालेला कोकणवासिय तुमच्या भुलथापांना यापुढे बळी पडणार नाही हे लक्षात घ्या. आणि या पुढे या प्रकल्पात विनाकारण खोडा घालण्याचे उपद्व्याप करू नका एवढेच!

मिस्टर राऊत, तुम्हाला कोणते स्थानिक लोक अपेक्षीत आहेत. स्थानिक शेतकरी ग्रामस्थांनाच प्रकल्प हवा आहे. म्हणूनच या रिफायनरी प्रकल्पासाठी नाणार परिसरातील चौदा गावातील स्थानिक ग्रामस्थ व शेतकºयांनी साडेआठ हजार एकर जमीन देण्यासाठीची संमत्तीपत्रे स्वखुशीने दिली आहेत. अन अन्य जमीनधारकही आता जमीनी दयायला स्वत:हुन पुढे येतील. मात्र राऊतांसारख्यांनी यापुढे कोणा स्थानिकांना चपलांनी मारण्याच्या धमक्या देवू नयेत. त्या चपला तुमच्यावरच उगारल्या जातील हे लक्षात घ्या.

ज्या नाणार परिसरातील चौदा गावात रिफायनरी प्रकल्प प्रस्ताावित आहे, त्या सागवे, कात्रादेवी, गोठीवरे, पडवे, विलये, कुंभवडे, तारळ, उपळे, नाणार, साखर या गावातील शिवसेनेचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि शिवसैनिकांनी यापुर्वीच प्रकल्पाला समर्थन दिलेले आहे. त्यातील जे शेतकरी जमीनदार आहेत त्यांनी प्रकल्पासाठी जमीनी देण्याचीही तयारी दर्शविली आहे. एवढेच नव्हे तर सागवे येथील शिवसेनेच्या जि. प. सदस्या सौ. लक्ष्मी शिवलकर, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी माजी जि. प. उपाध्यक्ष विलास अवसरे या सर्वांनीच, प्रकल्पाला पुर्वीपासूनच समर्थन दिलेले आहे. प्रकल्प व्हावा यासाठी या सर्वांचाच आग्रह आहे. तेव्हा खा. विनायक राऊत या स्थानिक शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसेैनिकांचा प्रकल्प समर्थनाचा आवाज दडपून टाकण्याचा तुमचा प्रयत्न आणि प्रकल्पाला समर्थन देणाºया शिवसैनिकांना चपलांनी मारण्याची भाषा यापुढे चालणार नाही. कोणीही तुमची अरेरावी खपवून घेणार नाही. तर त्यांच्यावर उगारलेल्या चपला तुमच्यावरच पडतील याचे कारण दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीच राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने प्रकल्प उभारण्याचा आता निर्णय घेतलेला आहे हे लक्षात घ्या. अन आता रिफायनरी प्रकल्प विरोधाची तुमची टिव टिव बंद करा. प्रकल्प समर्थनाच्या कोकणवासियांनी घेतलेल्या मुख्य प्रवाहात एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून सामील व्हा अन् तसे व्हायचे नसेल तर निदान गप्प तरी बसा. तुर्त एवढेच!

जाहिरात4