रेडी व पंचक्रोशीतील मोबाईल व इंटरनेट सेवा सुधारा:नागोळकर

जाहिरात-2

सौरभ नागोळकर : भाजप युवा मोर्चाच्या तर्फे महाप्रबंधकांना निवेदन

वेंगुर्ला :- तालुक्यातील रेडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना मोबाईल व इंटरनेट सेवा योग्य पद्धतीने मिळत नाही. या सुविधा तात्काळ सुस्थितीत उपलब्ध करन द्याव्यात अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे भाजप युवा मोर्चाच्या वतीने तालुका उपाध्यक्ष सौरभ नागोळकर यांनी बीएसएनएलचे महाप्रबंधक श्री सुनिल मांजी यांच्याकडे केली आहे.

रेडी व इतर पंचक्रोशीतील संपूर्ण परिक्षेत्रात कोणत्याही मोबाईल कंपनीची सेवा ही योग्य प्रकारे मिळत नाही आहे. त्यामुळे ग्रामस्थांना भ्रमणध्वनी वारे संपर्क करण्यास गैरसोय होत आहे. शासनाच्या शैक्षणिक विभागाने कोविड १९ या महामारीच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्याचे ठरविले आहे. त्याकरिता मोठी लोकवस्ती असलेल्या संपूर्ण रेडी गावात तसेच इतर पंचक्रोशीतील गावात मोबाईल रेंज इंटरनेट सेवेची अडचण निर्माण झालेली आहे. तसेच त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा रेडीतील व इतर पंचक्रोशीतील शालेय विध्यार्थ्यांवर होत आहे. तसेच रेडी व इतर पंचक्रोशीतील गावात मागील बऱ्याच काळापासून मोबाईल व इन्टरनेटचा अभाव असल्याने आपत्कालीन काळात महत्त्वाचे भ्रमणध्वनी संदेश देणे, दैनंदिन कामात उदा. बँकेचे व्यवहार करणे, बिल भरणे, गृहिणीना गृहपयोगी कामांकरिता संपर्क करणे इत्यादी अशा प्रकारची महत्त्वाची काम ठप्प झालेली आहेत. त्याचा मानसिक व शारीरिक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. तरी ही सेवा तात्काळ सुस्थितीत सुरू करण्याल यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन देताना श्री. नागोळकर यांच्या सोबत भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, भाजप रेडी जि.प.विभागीय उपाध्यक्ष जगन्नाथ राणे, भाजप रेडी ग्राम कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर केरकर, उपाध्यक्ष ओकांर कोनाडकर, भाजप रेडी ग्राम कमिटी युवा मोर्चा उपाध्यक्ष देवेंद्र राऊळ आदी उपस्थित होते.

जाहिरात4