वेंगुर्लेत बॅ. खर्डेकर कॉलेजला १९८४-८६ च्या माजी विद्यार्थ्यांकडून मेडिकल साहित्य भेट

जाहिरात-2

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्त्यव्याच्या सामाजिक भावनेतून उपक्रम

वेंगुर्ले | प्रतिनिधी
कोरोनाच्या या महामारीमध्ये वेंगुर्ल्यातील बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील १४०० विद्यार्थी आणि १०० प्राध्यापक/ प्रशासकीय कॉलेज कर्मचारी यांचं आरोग्य या कोरोना संसर्गाच्या आपत्तीमध्ये सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने आणि माजी विद्यार्थ्यांनी कर्त्यव्याच्या सामाजिक भावनेतून बॅ. खर्डेकर कॉलेज चे १९८४-८६ या वर्षीच्या माजी विद्यार्थ्यांच्या बिकेसी वेंगुर्ला ग्रुप ,मुंबई तर्फे आज कोरोना संसर्ग पासून संरक्षण देणारे खालील मेडिकल साहित्य बॅ. खर्डेकर कॉलेजचे प्राचार्य श्री विलास देऊलकर यांच्या कडे सुपूर्द केले.

सध्या कोरोना संसर्गाची प्रचंड दहशद संपूर्ण जगभर सुरु आहे. त्याचा कहर कोकणातसुद्धा आहे. त्यामुळे या माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता म्हणून कॉटन मास्क ३०००, सॅनिटायझर स्टॅन्ड ५, सॅनिटायझर स्टॅन्ड बॉटल ५, सॅनिटायझर पाच कॅन, पाच लिटर सोडियम हायपोक्लोराईड ४ कॅन, स्प्रे पंप १, फेस शिल्ड २, हॅन्ड ग्लोज (रबर ) २ हे साहित्य दिले. यावेळी बिकेसी वेंगुर्ला ग्रुप मधील कॉलेजचे माजी विद्यार्थी सुनील डुबळे, भिवा धर्णे, रमण खानोलकर, सुजाता नार्वेकर, नीता बागायतकार, मारुती धुरी, श्रीधर धारगळकर, चारुलता शेणई, अवधूत नाईक हे व प्राध्यापक आणि कर्मचारी उपास्थित होते.

जाहिरात4