शिरोडा-वेळागर येथे जखमी घारीला जीवदान

जाहिरात-2

वेंगुर्ले | प्रतिनिधी
शिरोडा वेळगार किनाऱ्यावर जखमी होऊन समुद्राच्या पाण्यात पडलेल्या घार पक्षाला वाचवून स्थानिक युवकांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला सुखरूप पणे सोडून दिले.
आज सायंकाळी सागररक्षक सूरज अमरे किनाऱ्यावर फेरफटका मारत असताना त्याला समुद्राच्या लाटेवरून उडणारा मासा पकडण्याच्या नादात घार पक्षी लाटेवर आपटून पाण्यात पडल्याचे दिसला. तत्काळ त्याने आपल्या सोबत कासव मित्र आबा चिपकर, ग्राम पंचायत सदस्य आजू अमरे, सचिन भगत, संतोष भगत यांच्या मदतीने त्या पक्ष्याला पाण्यातून बाहेर काढले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला सोडून दिले.

जाहिरात4