वेंगुर्ले तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.६७ टक्के : १५ शाळेंचा निकाल १०० टक्के

जाहिरात-2

तनया खुळे व सागर सामंत (९८.६०) टक्के गुणासह तालुक्यात प्रथम

वेंगुर्ला | प्रतिनिधी
माध्यमिक शालांत दहावी परिक्षेचा वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९९.६७ टक्के लागला. तालुक्यातून ९२७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ९२४ विदयार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यात अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेच्या तनया शशिकांत खुळे व वेंगुर्ला हायस्कूलचा सागर सखाराम सामंत(९८.६०) टक्के गुणासह संयुक्तीक तालुक्यात प्रथम क्रमांक तर,वेंगुर्ला हायस्कूलच्या सायली गावडे (९७.८०) टक्के गुणासह द्वितीय ,सिंधुदुर्ग विद्या निकेतन च्या मिताली नाईक ( ९७.६०) टक्के गुणासह तृतीय क्रमांक मिळविला. तालुक्यात १५ शाळेंचा निकाल १०० टक्के लागला.

तालुक्यातील शाळांचा निकाल आणि अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे :
दाभोली इंग्लिश दाभोलीचा ९५ टक्के निकाल लागला.निकिता परब (९१.२०) ज्योती पिंगुळकर(८८.६०),साईगणेश दाभोलकर (८१.६०)
वेंगुर्ला हायस्कूलचा १०० टक्के निकाल लागला.सागर सामंत(९८.६०)सायली गावडे (९७.८०) सेजल जाधव (९७)
पाटकर हायस्कूल प्राची दाभोलकर (९७.४०),साईदिप गिरप ,गायत्री बागुल (९२.२०)हर्षद मुळीक (९१.८०)
न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा प्रशालेच्या शंभर टक्के निकाल लागला. आकांक्षा वराडकर (९५),सर्वेश वराडकर,समृद्धी वेंगुर्लेकर(९४.८०),श्रेयस गवंडे (९४.४०)
सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा १०० टक्के निकाल लागला. मिताली नाईक ( ९७.६०)सानिका नेरूरकर ( ९६.६०) वैभव गावडे , प्रणव गावडे ( ९५.६०)
मदर तेरेसा स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला.राज नाईक (९३.४०)राजवीर देसाई (९२.४०)जुई बागायतकर (९१.४०)
न्यू इंग्लिश स्कुल मातोंड हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला.कोमल मोहिते (८९) रोहिणी घाडी (८८.२०) धनंजय सावळ (८६%)
अणसूर-पाल हायस्कूल चा निकाल १००टक्के लागला. तनुश्री सावंत( ९४.२०) तन्वी गावडे (९३.२०) अनंत केरकर (९२ टक्के)
शिवाजी हायस्कूल, तुळसचा १०० टक्के निकाल लागला. सिद्धी मांजरेकर (९७.२०) आकांक्षा गोळम (९१.४०)स्नेहल परब,जयदिप माळकर(९१)
वेतोरे श्री देवी सातेरी हायस्कूलचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ९९.१५ टक्के लागला.जयदीप परब (९७.२० ) चैतन्य नाईक (९६.४०), सृष्टी समीर नाईक ९६ टक्के.
खानोलकर हायस्कूल, मठ शाळेचा निकाल १०० टक्के निकाल लागला. चांदणी भगत ( ९१) ,ऋतुजा ढोपे ( ९० ) श्रुती धुरी ( ८९ )
कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल, आडेलीचा १०० टक्के निकाल लागला.तन्मया होडावडेकर (९७.४०)प्रणाली धरणे (९६.२०)सिद्धी गावडे (९५.२०)
अ.वि. बावडेकर विद्यालय, शिरोडा १०० टक्के निकाल लागला. श्रावणी मेस्त्री(९५.४०) श्रीवाणीसाळगावकर (९३.६०)वरद राजाध्यक्ष ,ऋचा दळवी (९२.२०)
माऊली विद्यामंदिर, रेडी ९४.४४ टक्के निकाल लागला.इशा लाड(९१.६०)जोस्पिन बेरेटो( ८५)धनश्री गोसावी (८०.२०)
श्री सरस्वती विद्यामंदिर आरवली १०० टक्के निकाल निकाल लागला. विनय बागकर ( ९१ ) सचिन अरुण बागकर -(८७.४०) सिद्धार्थ उदय कावळे (८२)
आसोली हायस्कूल, आसोली १०० टक्के निकाल लागला.महादेव धुरी (९४)प्रणिता पाटलेकर(९२.४०)कन्याकुमारी चिपकर (९१.८०)
स. का.पाटील केळुस चा १०० टक्के निकाल लागला.प्रवीण राठोड ( ९६.४०) निनाद राऊळ(९४.८०) रामचंद्र भगत( ९४.४०)
अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेचा १०० टक्के निकाल लागला .तनया खुळे (९८.६०)निकिता सावंत (९५.६०)प्रेरणा राठीवडेकर (९५.४०)

जाहिरात4