निकृष्ट पोषण आहारात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा हात : निलेश राणे

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी

रत्नागिरी आणि चिपळूण मधील पोषण आहार पुरवठादार गोदमातून बुरशी लागलेले धान्य पुरवठा करत होता. यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा हात असून लवकरच नावासकट हे प्रकरण बाहेर काढणार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये निकृष्ट पोषण आहार पुरवठादारांकडून दिला जात असल्याचा तक्रारी येत आहेत. निकृष्ट, सडलेला, आरोग्यास हानिकारक असून स्थानिक पातळीवरून होत असलेल्या तक्रारींकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचेच दिसत आहे. या प्रकाराबाबत भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून खळबळजनक खुलासा केला आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, रत्नागिरी, चिपळूण तालुक्यात शालेय पोषण आहार निकृष्ठ तसेच धान्य गोदममधून बुरशीयुक्त असताना देखील पुरवठादार निकृष्ट धान्य पुरवठा करत होता. ह्यात काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा हाथ आहे, असा आरोप करत ते ही काही दिवसात नावा सकट बाहेर काढणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

ह्या विषयात पण तक्रार करून अजून कुणालाही अटक झाली नाही, असे पुढे म्हंटले आहे. या प्रकरणात तक्रार होऊन देखील कोणला अटक झालेली नाही आणि निलेश राणे यांनी हे प्रकरण उघडकीस आणल्याने पुरवठादार आणि जिल्हा प्रशासन हे एकमेकांचे हित जपत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.

जाहिरात4