वेंगुर्ला शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन ठिकाणी नोंदणी कक्ष सुरु

जाहिरात-2

परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींची होणार नोंद आणि मार्गदर्शन

वेंगुर्ला | प्रतिनिधी
काही तांत्रिक कारणामुळे सुरु होण्यापासून रखडलेल्या वेंगुर्ला शहरातील तिन नोंदणी कक्षांचा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरात येणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवण्यासाठी २१ जुलै रोजी दोन ठिकाणी नोंदणी कक्ष सुरु करण्यात येणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे पोलिस प्रशासनाकडून पोलिस आणि होमागार्ड उपलब्ध झाले नसल्याने हे नोंदणी कक्ष सुरु करण्यास विलंब झाला.

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे या नोंदणी कक्षांसाठी खाजगी सुरक्षारक्षकांची नेमणू करुन शहरातील भटवाडी स्टॉप, दाभोली नाका व अणसूर नाका या तिन ठिकाणच्या नोंदणी कक्षांचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी वैभव साबळे, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, प्रशांत आपटे, साक्षी पेडणेकर, कृतिका कुबल, शितल आंगचेकर, विधाता सावंत, राजेश कांबळी व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

या तिन्ही ठिकाणी परजिल्ह्यातून आलेल्या सर्व लोकांची नोंद केली जाणार असून क्वारंटाईन कालावधीमध्ये घ्यावयाची काळजी व कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत सूचना देण्यात येऊन या सर्व लोकांना ग्रामीण रुग्णालय, वेंगुर्ला येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. वेंगुर्ला शहरात दाखल होणाऱ्या परजिल्ह्यातील सर्व लोकांची नोंदणी करुनच शहरात प्रवेश देण्यात येणार आहे. हे नोंदणी कक्ष वेंगुर्ला शहरात दाखल झालेल्या नागरिकांची नोंदणी होऊन त्यांना सुयोग्य प्रकारे क्वारंटाईन करता यावे या उद्देशाने या उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली.

जाहिरात4