धर्माजी बागकर यांची राष्ट्रवादी जिल्हा सेवादल अध्यक्ष पदी निवड

जाहिरात-2

वेंगुर्ले | प्रतिनिधी
राष्ट्रवादी जिल्हा सेवादल अध्यक्ष पदी वेंगुर्ले येथील धर्माजी बागकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रशासकीय स्तरावर व इतर ठिकाणी अडचणी आल्यास आपण सोडविणार. तसेच प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार असून पक्षाचे यापुढे जोमाने काम करूया तसेच चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्ष विविध ठिकाणी योग्य संधी देणार आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन पक्षाच्या स्तरावर होत आहे. असे प्रतिपादन श्री. सामंत यांनी केले.

वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उभादांडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रांतिक सदस्य अविनाश चमणकर यांच्या निवासस्थानी सोशल डिस्टंसिंगचे नियम पालन करून संपन्न झाली. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी-काँग्रेस पदाधिकाऱ्यांत महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर, माजी सभापती दीपक नाईक, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, शिक्षकसेलचे जिल्हाध्यक्ष अँथोनी डिसोझा, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर संजय गांधी निराधार समिती सदस्य मकरंद परब, सेवादल जिल्हाध्यक्ष धर्माजी बागकर, जिल्हा सदस्य नितीन कुबल, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, युवक तालुकाध्यक्ष रोहन वराडकर, बबन पडवळ , बावतीस डिसोजा, जिल्हा सरचिटणीस संदीप पेडणेकर, सुभाष दळवी, संपदा तुळसकर, श्याम सूर्याजी, प्रणिल भगत, संजय गावडे, गजमुख गावडे, रमाकांत गिरप, रुपेश तांडेल, विकास परब, संदिप सातार्डेकर, विद्याधर माळकर, सौ. प्रणाली चमणकर, साहिल चमणकर, ज्ञानेश्वर शिरोडकर, संदीप परब, चंद्रकांत साळगावकर आधी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व क्रियाशील कार्यकर्ते धर्माजी बागकर यांचे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी सेवादल सेलच्या जिल्हाध्यक्ष पदावर निवड करण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांनी जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
पक्ष संघटना वाढीसाठी विविध उपाय योजना आगामी काळात राबवण्याचे कार्यक्रम याची रूपरेषा ठरविताना देशात, राज्यात व जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेल्या अडीअडचणी यावर मात करण्यासाठी आपण घ्यावयाची काळजी याबाबत दीपक नाईक व नम्रता कुबल यांनी मार्गदर्शन केले. तसेच आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विकास सहकारी संस्था यांच्या निवडणुकांच्या संदर्भात पक्षसंघटना मजबूत करण्याच्या बाबतीत रयत शिक्षण संस्थेचे सदस्य अँथोनी डिसोझा यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.

या सभेच्या सुरुवातीस राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी सरोज परब यांचे पती रघुनाथ ऊर्फ नाना परब यांचे निधन झाल्याने त्यांना पक्षाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर यांनी तर आभार शहरअध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी मानले.

जाहिरात4