Corona राजापूर updates : कोदवलीतील 9 जणांचे कुटुंबच झाले कोरोना बाधित

जाहिरात-2

राजापूर । प्रतिनिधी
राजापूर शहरानजीकच्या कोदवली येथे चार दिवसापूर्वी सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ९ जणांचे संपूर्ण कुटुंबच पॉझिटिव्ह आल्याने परिसरात घबराट पसरली आहे . त्यामुळे राजापूर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ५७ इतकी झाली असून आज अखेर ॲक्टिव्ह रुग्ण २० झाले आहेत . तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व रुग्ण बरे झाले आहेत मात्र आता शहरातील जे 20 रुग्ण उपचार घेत आहेत तर राजापुरातील कोदवली साईनगर हा भाग कोरोना हॉटस्पॉट झाला आहे.

गेले तीन महिने राजापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात होती तर राजापूर शहरात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला नव्हता . मागच्या शुक्रवारी राजापूर शहरातील साखळकरवाडी येथे एक महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडली होती . त्यानंतर राजापूर शहरातील व्यापारी व कोदवली ग्राम पंचायत हद्दीतील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते .
गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोदवली येथील त्या रुग्णाच्या संपर्कातील एका कुटुंबातील तब्बल ९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे . त्यामुळे तालुक्यांची कोरोना रुग्ण संख्या आता ५७ वर पोहोचली आहे . आजपर्यंत एकूण ३६ रुग्ण बरे होवुन घरी गेले आहेत तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे त्यामुळे आज अखेर २० रुग्ण ॲक्टिव्ह आहेत .

जाहिरात4