परप्रांतिय व्यवसायात येणारच ! आपण काय करणार आहोत…?

संतोष वायंगणकर | माझे कोकण : २२ मार्चपासून देशभरातील व्यवसाय, उद्योग सारं बंद आहे. महाराष्टÑाचा आणि कोकणचा विचार करता याचे परिणाम जसे जगभरात आहेत तसे ते आपल्याकडेही कमी अधिक प्रमाणात आहेत. कोरोना या विषाणूने माणुस नावाच्या प्राण्याला जमिनीवर आणून ठेवले. माणसातील अहंकार आणि ‘मी’ पणा खरे तर गेल्या तीन महिन्यातील परिस्थितीने गळून पडला पाहिजे. आजही एवढं सर्वकाही घडल्यावर कोणी जपणुक करणार असतील तर ते दुर्दैवी आहे. इतक बरच काही या तीन महिन्यात गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच शिकविले आहे. कोरोना नंतरचा काळ कसा असेल? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. राजकिय नेते, पुढारी उद्योग कसे गतीमान होत आहेत. हे सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यातल नेमकं वास्तव काय आहे? हे तपासल्यावर वस्तुस्थितीची जाणीव होते. सध्याची जी अवती-भवतीची परिस्थिती जरी आनंददायी वाटत नसली तरीही हिच परिस्थिती कायम राहिल असं समजण्याचे कारण नाही. स्थित्यंतर हे होणारच फक्त या बदलत्या परिस्थितीमध्ये आपण कुठे ? कसे ? उभे रहाणार हे आपल्यालाच ठरवावे लागेल.

कोकणचा विचार करीत असताना येत्या वर्षभरात कोकणातून जाणारा मुंबई-गोवा हा महामार्ग चौपदरीकरण झालेला असेल. पुढील दोनवर्षे भारतातील पर्यटनासाठी बाहेर पडणारे कोणीही पर्यटनासाठी जगभ्रमंतीला बाहेर पडतील अशी शक्यता कमीच आहे. गेल्या तीन महिन्यात आणि आणखी काही कालावधीत पर्यटन व्यवसाय फार बहरेल असेही नाही. परंतु देशातील पर्यटक पर्यटनासाठी देशातच बाहेर पडतील तेव्हा गोवा हे पर्यटकांच्या नजरेसमोर असणारच ! त्याचवेळी गोव्याच्या सीमेवर असलेला कोकण रत्नागिरी, सिंधुदुर्ग पर्यटनासाठी सज्ज असले पाहिजेत. यासाठी सरकार काय करणार ? याचा फार विचार आपण न करता पर्यटन व्यवसायात कोकण कशी गती घेऊ शकेल याचा विचार आपण करायला हवा. निसर्गाने कोकणाला भरभरून दिलय. फक्त त्याच मार्केटींग आणि व्यावसायिकतेने ते टिकवणे हे नीट जमवावे लागेल. कोकणातून जाणाºया या चौपदरीकरण महामार्गाचे आपण लाभार्थी असायला हवे. परंतु आताच्या घडीला अनेक हॉटेल, धाबे हे परप्रांतियांनी उघडल्याचे दिसून येते. कोकणातील भूमीपुत्राला जमिनीचे पैसे मिळाले. यातील अनेकांनी मोठाली घर बांधली विषय संपला व्यावसायिकता नजरेसमोर का ठेवली गेली नाही.

आपण व्यवसाय करायला परप्रांतियांनी विरोध केला नाही. त्यांचा काही संबंधही नाही. परंतु अगदी लहान-सहान रसवंती गाडी, भेळ-पुरी, ज्युस गाडी हे सगळ चालवणारे परप्रांतिय आहेत. यात दोष त्यांचा नाही. तर आपली रस्त्यावर उभ राहून व्यवसाय करण्याची मानसिकता नाही. कोणाला तरी प्रश्न पडेल तुम्ही लिहीताय ते तुम्ही रस्त्यावर व्यवसाय केला असता काय ? हो, मी कॉलेज शिकत असताना लिंबू सरबत नांदगावच्या तिठ्यावर विकूनच शिकलोय. चहा-भजी खाताना किंवा व्यापाºयांच्या बैठकीमध्ये परप्रातियांना विरोध करायची भाषणं ठोकली जातात.

आपले तरूण यातले किती व्यवसाय करण्यासाठी पुढे येतात ? अहो, मुख्य बाजारपेठांमधील निम्मे अधिक व्यवसाय आपल्याच व्यापाºयांनी भाड्याने जागा देऊन मोकळे झाले आहेत. एक-दोन नव्हे किराणा, कापड, हार्डवेअर असे सर्व कमाईच्या व्यवसायात परप्रांतियांनी पाय रोवले आहेत. आपले तरूण वडीलोपर्जित व्यवसाय बंद करून भाड्याने देऊन येणाºया भाड्यावर ऐषोआराम करीत आहेत. कणकवलीत अमित सापळे या तरूण व्यापाºयाने किराणा बझार सुरू केला. सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या. थोडी वेगळी वाट त्या तरूण व्यापाºयाने चोखाळली आहे. अन्यत: सर्वत्र आहे तेही टिकविण्याची मानसिकता दिसत नाही. हे दुर्दैव आहे.

कोकणात मोठ्यासंख्येने गावो-गावी चाकरमानी आले आहेत. मुंबईत रहाण्याची व्यवस्था आणि नोकरीची स्थिरता नसणारे अनेक आहेत. या अस्थिरतेमुळे यातले बरेचसे कोकणात स्थिरावण्याच्या मानसिकतेत आहेत. हे गावो-गावी चालणाºया चर्चेवरून समजून येत आहे. खरोखरच जर अस होणार असेल तर त्यांनीही वेगवेगळ्या व्यावसायातून पुढे यायला हवे. केवळ परप्रांतिय येऊन व्यवसाय करतात म्हणून आदळआपट करून चालणार नाही. कोकणातील तरूणांनाही व्यावसायाच्या अनेक संधी आहेत. कोरोनाच्या तीन महिन्यात मच्छि, भाजी विक्री आदी व्यवसाय करताना स्थानिक तरूण दिसला हे परिस्थितीने घडविले. परंतु आता आपली गरज आणि आर्थिक उन्नती साधण्याच्या विचारातून व्यवसायात करताना दिसले पाहिजेत. संयम आणि चिकाटी, कष्ट यातूनच व्यावसायिक यश प्राप्त करता येऊ शकेल. कोकणातील तरूणांनी विचार करावा आणि आर्थिक संपन्नतेचा मार्ग गावात आणि घरापर्यंत आणावा.

जाहिरात4