मान्सून पुन्हा सक्रिय; मुसळधार बारसण्याची शक्यता; बळीराजा सुखावला

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी

मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने आता जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा जोर धरला आहे. सोमवारी दिवसभरात ९८.७३ मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली.

आता जुलै महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच २ जुलैपासून महाराष्ट्रामध्ये वरुणराजा अगदी मुसळधार बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोवा, मराठवाड्यातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची सुरुवात झाली आहे. हाच पाऊस येत्या काही तासांमध्ये चांगला जोर पकडणार आहे. शिवाय रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये आणि त्यासोबतच पुणे- सातारा भागातही मान्सून सक्रिय होऊन मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

गेला आठवडाभर अनेक दिवस उसंत घेत पावसाने दडी मारली होती. सोमवारी दिवसभरात पावसाने १०.९७ मि. मी.च्या सरासरीने ९८.७३ मि.मी पाऊस झाला. मान्सूनच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात पावसाने जोर धरला होता. दरम्यान, आगामी तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून, किनारी भागात आणि दुर्गम भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दोन दिवस सायंकाळी पाऊस पडत असल्याने भातलावणीला हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात4