खेड बाजारपेठ राहणार ८ दिवस बंद

जाहिरात-2
०१ ते ०८ जुलै दरम्यान किराणा दुकानांसह सर्व दुकाने व आस्थापना राहणार पूर्णपणे बंद!!

खेड । प्रतिनिधी
जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी “ब्रेक दि चेन” या मोहिमेंतर्गत येथील बाजारपेठ १ ते ८ जुलै या कालावधीत बंद रहाणार आहे

२८ जून २०२० रोजी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात दि.०१ ते ०८ जुलै दरम्यान कडक निर्बंधांसह लॉकडाऊनची घोषणा केली. जिल्हा प्रशासनाकडून सदरहू मोहिमेद्वारे एक आठवड्याच्या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य दुकाने,आस्थापना व सर्व खासगी व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु खेड शहरातील किराणा व्यापारी समुदायाने याबाबत आज दि.२९/०६/२०२० रोजी खेड शहरातील सर्व प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासन यांचेशी सखोल चर्चा करून स्वयंस्फूर्तीने दि.०१ जुलै २०२० ते दि. ०८ जुलै २०२० दरम्यान किराणा दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

खेड शहरात होणारा कोरोनाचा प्रसार समूळ नष्ट करण्यासाठी एकत्रितपणे लढा देण्याच्या उद्देशाने किराणा व्यापारी व्यावसायिकांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

जाहिरात4