फुरुस पंचक्रोशीतील नळपाणी योजना पुन्हा सुरू होणार !

जाहिरात-2

चिपळूण | प्रतिनिधी

नदीत रसायन टाकण्यात आल्या नंतर दूषित झालेल्या पाण्यामुळे बंद करण्यात आलेल्या नळपाणी योजना आज पासून सुरू करण्यात आल्या आहेत. तर पोलिसांच्या तपासबाबत मात्र संशयास्पद चर्चा या विभागातील शेकडो गावात सुरू झाल्या आहेत.

फुरुस बादेकोंड नदीत अज्ञात व्यक्तीने रसायन टाकले होते. यामुळे नदीचे पाणी दूषित झाले होते ही नदी माखजन बुरबाड पर्यत जाते. या ठिकाणचे पाणी दूषित झाल्याने चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील काही गावातील नळपाणी योजना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. कुशिवडे, कोकरे, डिकेवडी, कोकरे, नाभिकवाडी, खेरशेत, वाटलेवाडी, कुशिवडे, भागडेवाडी, सोनारवाडी, बौद्धवाडी, शिंदेवाडी, गोसावी वाडी, कुशिवडे, चिंचवाडी डिकेवाडी या ठिकाणच्या काही गावातून प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा सुरू केला होता. सदरच्या विहिरीचे पाणी दूषित असल्याचा अहवाल आल्यानंतर हे पाणी पिण्यास बंद करण्यात आले होते. आता चौदा दिवसांनी पाणी योजना सुरू करण्यात आला आहे.

चिपळूणच्या काही गावात ही स्थिती असताना संगमेश्वर मधील काही गावात अशीच स्थिती होती. या रसायनामुळे मासे आणि मगरी मोठ्या प्रमाणात मृत झाल्या होत्या. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र तपासात प्रगती होत नसल्याने आणि आरोपीस अटक होत नसल्याने वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांनी या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर पोलिसांच्या तपासबाबत या विभागातील जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत असताना तपास ही सुरवातीपासून संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला जनतेला दिसून आला आहे. पोलीस स्थानकात या गंभीर प्रकरणाची माहिती तात्काळ देण्यात आली होती. मात्र याची दखल दुसऱ्या दिवशी घेण्यात आल्यानेच हा संशय बळावला असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र या प्रकरणात डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी लक्ष घातल्याने आरोपी मिळतील अशी आशा व्यक्त केली जात असली तरी सध्या पोलिसांचा तपास मात्र संशयास्पद असल्याचा ठाम विश्वास आता जनतेचा होऊ लागला आहे.

जाहिरात4