मधमाशांच्या हल्ल्यात नेपाळी कामगाराचा दुर्दैवी मृत्यु

जाहिरात-2

देवगड : -खत घालण्याचे काम जामसंडे वेळवाडी येथील कलमबागेत करीत असताना मधमाशांच्या हल्ल्यात नेपाळी कामगार नवलसिंग भट्टे टामाटा(६४) याचा दुर्दैवी मृत्यु झाला.ही घटना जामसंडे वेळवाडी येथे सोमवारी दुपारी १२.३० वा.सुमारास घडली.या हल्ल्यात एक कामगार जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार इळये असरोंडी येथील विलास बाळकृष्ण कदम यांनी कराराने केलेल्या वेळवाडी येथील प्रशांत सुंदर चांदोस्कर यांची कलमबागेत विलास बाळकृष्ण कदम व त्यांच्यासमवेत प्रकाश विष्णू पवार, पुनोज गणपत करंजे, धोंडू दौलत कदम, नवलqसग भट्टे टामाटा, करण टामाटा, सुमन करण टामाटा हे सातजण खत घालण्याचे काम करीत होते. यावेळी खत टाकल्यानंतर त्यामध्ये पालापाचोळा टाकण्याचे काम धोंडू दौलत कदम(६४) व नवलसिंग भट्टे टामाटा(६४) हे करीत होते.

पालापाचोळा टाकत असतानाच झाडावर असलेल्या मधमाशांनी अचानक हल्ला चढविला.झालेल्या प्रकाराने सर्वजण घाबरले व जीव मुठीत धरून पळत होते मात्र वयोवृध्द असलेल्या धोंडू दौलत कदम(६४) व ननवलसिंग  भट्टे टामाटा(६४) यांना पळता येत नव्हते.यातील धोंडू यांनी कापड अंगावर घेवून चिखलात बसल्याने ते सुटले मात्र नवलसिंग  टामाटा हे मधमाशांच्या प्रहाराने ते बेशुध्द पडले.त्यांना यांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले मात्र उपचार करताना त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. तर मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या धोंडू दौलत कदम यांच्यावर देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत देवगड पोलिस स्थानकात विलास बाळकृष्ण कदम यांनी खबर दिली. या मृत्यची प्राथमिक चौकशी सहा.पोलिस निरीक्षक संजय कातिवले यांनी केली आहे.पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून तपास पो.हे.कॉ.एस्.डी.कांबळे करीत आहेत.

जाहिरात4