नागरिकांना शिस्त लावलेला सगळी शासकीय यंत्रणा रस्त्यावर

जाहिरात-2
अधिकारी वर्गकडून कारवाईचा बडगा, ९ हजारांचा दंड वसूल
खेड | प्रतिनिधी
खेड तालुक्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र सर्व सामान्य नागरिक विना मास्क तसेच गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतरचा फज्जाच उडवत असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी खेड भरणे मार्गावर सर्व तालुका अधिकारी मिळून विना मास्क तसेच दुचाकी तीनचाकी चारचाकी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला.
तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असताना नागरिक मात्र शासनाकडून देण्यात आलेल्या सूचना नियम धाब्यावर बसवून खेड शहरा सह विनाकारण फिरत असल्याने येथील प्रशासना समोर वाढती गर्दी, वाहने यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी सांयकाळीच्या सुमारास खेड भरणे मार्गावर सर्व तालुका अधिकारी त्यामध्ये पोलीस उप विभागिय अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षका सुवर्णा पत्की, तहसीलदार सौ प्राजक्ता घोरपडे, गट विकास अधिकारी पारसे, आरोग्य विभाग या सर्वांनी मिळून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत विना मास्क , दुचाकी चालक यांच्या कडून तासा भरात तब्बल ९ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
जाहिरात4