लोटे एमआयडीसी मध्ये कोरोनाचा शिरकाव; ६ जण कोरोनाग्रस्त

जाहिरात-2
खेड मध्ये महिलेला कोरोनाची लागण,  शहरात भीतीचे वातावरण
खेड | प्रतिनिधी
खेड तालुक्यात कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून  ७ नव्या रुग्णांची नव्याने भर पडली असल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा ७२ वर जाऊन पोहचला आहे . ७ रुग्णापैकी ६ रुग्ण लोटे एमआयडीसी मधिल घरडा वसाहत मध्ये आढळून आले तर १ महिला खेड शहरातील कुंभारवाडा परिसरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील रुग्ण संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढून कोरोना चा कहर सुरूच होता. रुग्ण  संख्येत ७ नव्या रुग्णाची भर पडल्याने हा आकडा ७२ वर जाऊन पोहचला आहे. त्यात लोटे एमआयडीसी मध्ये ही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे लोटे घरडा वसाहत येथे तब्बल ६ रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे येथील वसाहत प्रशासनाकडून सील करून येथील १०० हुन अधिक जणांची तपासणी केली आहे हा परिसर कंटेमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान खेड शहरातही कोरोनाने हात पाय पसरण्यास सुरवात केली असून शहरातील कुंभारवाडा परिसरात दोन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या एका रुग्णाचा अहवाल पोजिटिव्ह आल्याने त्यास उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मात्र या कोरोना बाधिताच्या आईचा ही अहवाल पोजिटिव्ह आल्याने खेड शहरातील कोरोना बाधितांची संख्या २ झाली आहे .
खेड शहरात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आल्याने येथील यंत्रणा हादरून जात तात्काळ कुंभारवाडा, एकविरा नगर परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करत या ठिकाणच्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रशासना कडून मज्जाव करण्यात आला आहे.
खेड शहरात रूग्ण संख्या वाढत असताना नागरिक मात्र मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी करत असल्याचे चित्र असून सोशल डिस्टनिंग ला हरताळ फासला जात आहे त्यामुळे कोरोना चा धोका देखील कमालीचा वाढला आहे.
जाहिरात4