उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या गावात सापडला दारूचा मोठा साठा; एकास अटक

जाहिरात-2
मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याच्या केबिनला टाळे; माहिती देण्यास टाळाटाळ

रत्नागिरी । प्रतिनिधी
रत्नगिरीतील उच्च व तंत्र शिक्षण मंत्रांच्या घराशेजारीच पाली येथे दारूचा अवैध साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क खात्याने साठा जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची महिती देण्यास रत्नागिरीच्या उत्पादन शुल्क विभागाकडून टाळाटाळ केली जात असून कार्यवाही करणारे जाधव नामक अधिकारी कार्यालयाला टाळे लावून निघून गेले आहेत. याबाबत रत्नागिरीचे प्रभारी व सिंधुदुर्गचे अधीक्षक श्री. तडवी यांना विचारले असता त्यांनी मात्र या घटनेला दुजोरा दिला आहे.

दरम्यान उत्पादन शुल्क विभागाच्या रत्नागिरीतील अधिकाऱ्याच्या माहिती न देण्याने विविध शंका उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाली येथे दि २५ जून रोजी हि कारवाई केली. या विभागाने मिळालेल्या टीप प्रमाणे सापळा रचला होता. त्यात दारूचा मोठा साठा या विभागाला मिळाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शरद जाधव यांच्या नेतृत्वाखाली हि कारवाई झाली आहे. या प्रकरणी एकाला अटक सुद्धा केली आहे. मात्र याची अधिकृत माहिती देण्यास निरीक्षक जाधव टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

सिंधुदुर्ग चे अधीक्षक आणि रत्नागिरीचे प्रभारी श्री. तडवी यांच्या निर्देशानंतरही याबाबत माहिती देण्याऐवजी श्री. जाधव यांच्या मोबाईल बंद होता तर त्यांच्या केबिनला सुद्धा कुलूप घालण्यात आले होते. सोमवारी दुपारी वरिष्ठांच्या आदेशकडे दुर्लक्ष करून चक्क केबिन ला कुलूप घालून बाहेर गेलेल्या श्री जाधव यांच्या या वागण्याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

हि घटना झाल्यानंतर मंत्रांच्या भावाने हे प्रकरण दडपण्याचा जोरदार प्रयत्न केला अशी चर्चा सध्या रत्नागिरीत जोरदार सुरु आहे. उत्पादन शुल्क विभागाने याबाबत कोणतीही तत्काळ न दिल्याने या धाडीबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहे.

जिल्ह्यातील अनेक निर्णयातील हस्तक्षेप करून प्रशासनाला गोंधळात टाकल्याचीही चर्चा असतानाच ज्यांनी युवा पिढीला योग्य मार्ग दाखवायचा त्याच्याच घराशेजारी असा साठा सापडल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु असून हे आशीर्वाद होते कि काय अशी जोरदार चर्चा सध्या रत्नागिरीतील सोशल मीडियावर सुरु आहे.

जाहिरात4