सिंधुदुर्गाचो हायटेक दशावतार

जाहिरात-2

मन सुध्द तुझं गोस्त हाये पृथिविमोलांची…
      तू चाल पुढे.. तु चाल पुढे…तुला रे गड्या भिती कुणाची..पर्वा बी कुणाची…

अशा पंक्ती केवळ माणसालाचा ऊर्जा देतात असे नाही तर कलात्मक क्षेत्रात जेव्हा या पंक्ती सत्यात उतरतात तेव्हा एक वेगळी ऊर्जा ,चैतन्य आणि तेज पहायला मिळते आणि कलात्मकतेने टाकलेली पावले अजुन वेगाने पडतात. दशावतार हा सिंधुदुर्गाचा श्वासच म्हणावा लागेल. आजच्या या 4G च्या युगात हि तरुणाईचे दशावतारा वरचे प्रेम पाहिले कि,ओढ म्हणजे काय त्यांची कल्पना येते. आज सिंधुदुर्गात जवळपास 150 छोटी मोठी दशावतार मंडळे कार्यरत आहे.आणि विशेष म्हणजे धर्माला ही काही अंशी मुठमाती देत केला जाणारा दशावतार हा एकत्मता,बंधुता आणि प्रबोधनाचा आगळावेगळा अविष्कार आहे.

कला कोणती ही असो ती त्या कलावंतासह रसिकांना नवी उमेद आणि दृष्टी देते.पण दुर्दैवाने आज सिनेसृष्टी मध्ये आत्महत्येचे प्रकार वाढलेले दिसतात प्रचंड पैसा,प्रसिध्दी मान-सन्मान असतानाही हे घडते कारण जीवनात येणारे समस्यामुळे माणसे माणसांना सोडतात आणि मरणाला मिठी मारतात पण आज दशावतार लोककलेत दशावतारी राजाच्या दुर्दैवाचे दशावतार होताना ही हा दशावतारी कलावंत ताठ मानेने आणि अभिमानाने लोकरंजन करत नवा आदर्श ठेवतो. दररोज ची जागरण सतत चा प्रवास वेळी अवेळी जेवण यांचा थेट परिणाम या दशावतारी कलावंतावर होतो पण मृत्यृला,आजारपणाला घाबरतील ते दशावतारी कलावंत असतील कसे?अनेक खडतर आव्हानाना तोंड देत आपल्या प्रपंचाची गाडी हाकणारा दशावतारी कलावंत ऐन् कोरोना महामारीत मोडलाय खरा! पण तो झुकला नाही! नाही त्यांने आपल्या परिस्थितीचे भांडवल केले नाही!…

नाही आत्महत्येसारखी शेवटी पावले उचलली कारण ही कला त्याचा श्वास आहे..होय हे खरे हा दशावतारी कलावंत पैशाच्या दृष्टीने कमी आहेच पण मनाने श्रीमंत.. म्हणून त्याला कधीच आपल्या आयुष्याची भिती वाटत नाही..ना घरातील सदस्याची.. कारण तितकीच साथ समर्थ पणे देणारा रसिकवर्ग या लोककले कडे जो आजही तितक्याच आस्थेने आणि श्रध्देने या लोक कलावंताकडे बघतो. कोरोना विषाणुने जगात आपली दहशत दाखवली आणि सपुर्ण जग भितीच्या दहशती खाली झाकोळले, याचा फटका सगळ्या सोबत दशावतार कलावंताना ही बसला आणि हार्मोनियम, मृंदुग,झांज याबरोबरच दशावतारी संवाद थांबले.अन् सिंधुदुर्ग सुनासुना झाला.यांचे कारण म्हणजे इथला रसिक सैरभैर झाला.

सिंधुदुर्गातील रसिकांचे एक विशेष आहे दशावतार नाटक करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन इथे होते. नाहीतर महाराष्ट्रात ब-याच ठिकाणी एखाद्या कार्यक्रमा साठी लोककला सादर होतात आणि हे वेगळे पण आहे या दशावतारी रसिकांचे त्याच्या सर्जनशील वृत्तीचे. दशावतार लोककले साठी एखाद्या कार्यक्रम करणे. कोरोनाच्या या संसर्गाची बाधा होवु नये म्हणून सगळेच बंद झाले खरं आणि जगावं कस हा प्रश्न अनेकांना संतावु लागला.

पोटापाण्याच्या प्रश्नांच्या प्रश्नांच्या सोबतच जगायला शिकवणारा आणि लोकरंजन करणारा दशावतार ही नव्या वाटा शोधु लागला आणि धावणा-याला मार्ग सापडतो तस youtube च्या माध्यमातून आई प्रतिष्ठान आणि The Event Blaster या संस्थानी पुढाकार घेत दशावतार थेट youtube च्या माध्यमातून रसिकदरबारी आणण्याचा प्रयत्न यशस्वी केला.अनेक शंका ..मनात होत्या ख-या पण पुनश्च मायबाप रसिकांनी उंदड प्रतिसाद दिला आणि या नव्या माध्यमाचा वापर करत रसिकांनी भरघोस आर्थिक मदत केली आणि “देणा-याचे हात हजारों दुबळी माझी झोंळी” याचा प्रत्येय आला. जीवनातील विविध आव्हानांना तोंड देत आज दशावताराचा नवा ट्रेड रसिकांनी सहज स्विकारला त्याचे स्वागत ही केले पण मायबाप शासन मात्र आजही डोळे बंद करुन आहे.. दशावतारी कलावंत आजही विविध समस्यांचा चक्रव्युहात सापडलाय खरा..पण हे भेदायचा ही त्याचा प्रामाणिक प्रयत्नच या लोककलेच्या एका नव्या पर्वाची सुरवात आहे… आणि रसिकांच्या विश्वासावर हे पर्व अधिकच रंगतदार ठरणार हे मात्र नक्की !


प्रा.वैभव खानोलकर
नेमळे पंचक्रोशी माध्य.उच्च माध्य.विद्या.सावंतवाडी 

जाहिरात4