बिनकामी झालेल्या पारकरनी प्रसिद्धीसाठी राणेंवर टीका करू नये-समीर नलावडे

जाहिरात-2

आमदार नितेश राणे यांच्या ‘नखाची सर’सुद्धा पारकर यांना येणार नाही

साधे मास्क वाटपही स्वखर्चातून पारकर करू शकले नाही हे मोठे अपयश

कणकवली:- मार्च महिन्यामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला कोरोनामुळे त्रास होऊ नये म्हणून आमदार नितेश राणे यांनीच सामाजिक भान राखत अनेक उपाययोजना राबवल्या. या काळात आता टीका करणारे संदेश पारकर कुठे बैठक घेत होते ते कणकवली वासियांना माहिती आहे. त्यामुळे नितेश राणेंवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न संदेश पारकर यांनी करू नये.आणि महसूल, आरोग्य विभाग या सरकारी यंत्रणेला त्रास देवुनये असा सल्ला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे.

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी प्रसिद्धीपत्रातून संदेश पारकर यांचा समाचार घेतला ते म्हणालेत,सिंधुदुर्ग जिल्हावासीय कोरोना पासून दूर रहावेत यासाठी आमदार नितेश राणे यांनी पीपीई किट, मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप दहा लाख अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप तसेच मोफत कमळ थळी असे अनेक उपक्रम व उपाय योजना राबवल्या. जिल्हा वासियांच्या आरोग्याला प्राधान्य देत वेळोवेळी प्रशासनाला सूचनाही केल्या. साहित्य वाटप हे सर्व नितेश राणे यांनी स्वखर्चातूनच केले. राज्य सरकार कोरोना रोखण्‍यासाठी सिंधुदुर्गाला एकही दमडी देत नसताना नितेश राणे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली.

पण सत्ताधारी पक्षात असलेले पारकर हे जनतेच्या काळजी पेक्षा आपल्या बैठकांमध्ये मग्न होते. त्यांच्या बैठका कुठे व कसल्या चालायच्या ते कणकवली शहरातील जनता जाणते. त्यामुळे नितेश राणेंवर टीका केली की प्रसिद्धी मिळते म्हणून पारकर यांचा खटाटोप सुरू आहे. पारकर यांनी गेल्या अडीच महिन्यात असा कोणता सामाजिक उपक्रम राबवला किंवा कोरोनाला रोखण्यासाठी काय केले ते जाहीर करावे. शिवसेनेच्या नेत्यांच्या पदराआड राहुन प्रसिद्धीत राहण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. कोरोना काळात जनतेचे हित जपण्यापेक्षा स्वतःच्या हिताचा जास्त विचार पारकर यांनी केला.ज्या कणकवली शहरातील जनतेने पारकर यांना सरपंच ते नगराध्यक्ष पर्यत पदे दिली त्या कणकवली शहरातल्या जनतेसाठी पारकर यांनी आतापर्यंत काय केले .

साधे मास्क वाटपही स्वखर्चातून पारकर यांना करता आले नाही. किंवा शासनामार्फत ही कोणताही निधी कोरोना उपाययोजनांसाठी पारकर यांनी आणला नाही. नितेश राणे यांच्या कोरोना काळातील उपक्रमांची नकाची हि सर पारकर यांना नाही त्यामुळे राजकारणात बिनकामी झालेल्या पारकर यांनी केवळ प्रसिद्धीसाठी राणेंवर टीका करू नये. कोरोना रुग्णांच्या संपर्कात येऊनही पारकर कणकवली शहरात खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे पारकर यांच्या मनात शहरवासीयांच्या आरोग्याची किती काळजी आहे हे दिसून येते. अशा स्थितीत पारकर यांच्याकडून जबाबदारीची अपेक्षा ठेवणे ही चुकीचेच आहे.असे कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

जाहिरात4