चिपळूण भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे गावोगावी वाटप

जाहिरात-2

चिपळूण | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी लिहिलेले पत्र प्रत्येक गावागावात, घराघरात पोहोचविण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले.

चिपळूण तालुका अध्यक्ष विनोद भोबस्कर यांनी प्रत्येक जि. प. गटामध्ये हे काम चालू केले आहे. पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतीच्या कामाला वेग आला आहे. भात लावणीची कामे चालू आहेत. त्यामुळे या दिवसात कोणताही शेतकरी घरी भेटणार नाही हे माहीत असल्याने येगाव मधील भाजपा चिपळूण तालुका सरचिटणीस मारुती होडे यांच्या शेतात जाऊन शेतकर्‍यांना पत्र देण्यात आले.

विनोद भोबस्कर स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकर्‍यांना येणाऱ्या अडचणींची जाणीव आहे. शेताच्या बांधावरती जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांसाठी राबविण्यात आलेल्या योजना, उज्वला गॅस योजना, किसान सन्मान योजना, जन धन योजना अशा अनेक योजनेंची माहिती देण्यात आली. तसेच मोदीजींचे पत्र वाचून दाखवलं. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर ,तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, मारूती होडे, येगाव बुथ कमिटी अध्यक्ष बाब्या होडे व शेतकरी महिला उपस्थीत होत्या.

जाहिरात4