कामथे उपजिल्हा रुग्णालयाला आर्थिक सहाय्य; आ. शेखर निकम यांनी केले मुस्लिम समाजाचे कौतुक

जाहिरात-2

चिपळूण | संतोष सावर्डेकर

तालुक्यातील मुस्लिम समाजाने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयाला दहा लाखांचे आर्थिक सहकार्य केले आहे. यातून ३ वार्ड सुसज्ज करण्यात आले आहेत. तसेच आयसीयू देण्यात आले आहेत. या कार्याबद्दल चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी मुस्लीम समाजाचे कौतुक केले. कोरोनाग्रस्त रुग्णांवर यामुळे कामथे रुग्णालयात तपासणी करणे व उपचार करणे सोयीचे होणार आहे, असे या वेळी निकम यांनी सांगितले.

मुस्लिम समाजाने आरोग्य सेवेसाठी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे, त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे, अशा शब्दात आमदार निकम यांनी मुस्लीम समाजातील बांधवांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. या वेळी इब्राहीम दलवाई, नाजीम अफवारे, मुराद अडरेकर, मुस्लिम साहित्याचे अभ्यासक यासीनभाई दळवी, अश्रफ देसाई, रऊफभाई बांगडे, समीर काझी, खालीद पटाईत आदी उपस्थित होते. तसेच मिलिंद कापडी, दादू गुढेकर, सिद्धेश लाड हेही या वेळी उपस्थित होते.

जाहिरात4