‘कोरोनाचा कहर’ राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत कणकवलीच्या चैतन्य केळकर चे यश

जाहिरात-2

आधार फाऊंडेशन इंडिया च्या वतीने स्पर्धेचे केले होते आयोजन

संतोष राऊळ :- आधार फाऊंडेशन इंडिया च्या वतीने ‘कोरोनाचा कहर’ या विषयावर आधार बालमित्र राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत कणकवली येथील कु.चैतन्य संतोष केळकर हा राज्यात चौदावा आला आहे. या स्पर्धेचा निकाल जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून दोन गटातून जाहीर करण्यात आला आहे. आधार फाऊंडेशन, मुंबई(महाराष्ट्र राज्य ) चे मुख्य सचिव किशोर शिंदे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे आभार मानले तसेच प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाईल आणि विजेत्यांची नावे घोषित करून त्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.किरण विश्वनाथ यांच्या संकल्पनेतून घेतलेल्या या आधार बालमित्र चित्रकला स्पर्धेचा निकाल दोन गटातून जाहीर केला आहे.

जाहिरात4