आता पास असला तरीही मिळणार नाही रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश…. हा मार्ग झाला बंद

जाहिरात-2

खेड । प्रतिनिधी
महाड विन्हेरे नातूनगर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कशेडी घाट मार्ग वापरावा. मिशन ब्रेक द चेन – 1 ते 7 जुलै या कालावधीत राबविले जाणार असून या कालावधीत प्रवाशांना बाहेरील जिल्ह्यातून रत्नागिरीत जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही.

केवळ वैद्यकीय अति- आवश्यकतेसाठीच प्रवेश मिळेल. अन्यथा पास असला तरी प्रवेश मिळणार नाही. जीवनाश्यक वस्तूची वाहतुकीला परवानगी आहे. कृपया आप्तस्वकीय , मित्राना कळवा असे खेडचे उपविभागीय अधिकारी अविष कुमार सोनोने यांनी कळवले आहे.

जाहिरात4