मनसे गुहागरच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

जाहिरात-2

गुहागर | प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्याच्या वतीने वालावलकर रुग्णालय डेरवण याच्या संयुक्त विद्यमाने कोरोना च्या पार्श्वभूमीवर असलेली रक्ताची गरज ओळखून मनसे राज्य सरचिटणीस तथा खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर याच्या नेतृत्वाखाली व गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर, माजी तालुका अध्यक्ष राजेश शेटे, संपर्क अध्यक्ष गणेश कदम, सह संपर्क अध्यक्ष गिरीश चव्हाण, याच्या नियोजनखाली शृंगारतळी येथील संत तुकाराम हॉल गुहागर बाजार येथे झाला.

यावेळी चिपळूण तालुका अध्यक्ष संतोष नलावडे, चिपळूण शहराध्यक्ष गणेश भोंदे, चिपळूण तालुका उपाध्यक्ष सुनील हळदणकर, खेड तालुका उपाध्यक्ष नाना चाळके माजी चिपळूण शहर अध्यक्ष मुबिन गोठे चिपळूण प्रसार माध्यम प्रमुख सुबोध सावंत, उपविभाग अध्यक्ष आकलेश जाधव, गुहागर तालुका डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पवार व पाटपन्हाळे चे सरपंच संजय पवार यांनी विशेष उपस्थिती लावली. या कार्यक्रम यशस्वीरीत्या व्हावा म्हणून वकील संदीप आग्रे, विराज सुर्वे, विभाग अध्यक्ष प्रमोद राऊत महेंद्र राऊत, संदीप भेकरे, नवनाथ साखरकर,योगेश आंबेकर,,सुशांत भेकरे,राहुल रहाटे,विराज सालवी,सुनिल पागडे आदी लोकांनी विशेष प्रयत्न केले. जवळ पास ५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले

जाहिरात4