प्रधानमंत्री मोदी यांनी गरिबांसाठी तिजोरी खुली केली -केंद्रीय मंत्री सौ.स्मृती इरानी

जाहिरात-2

माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे,देवेंद्र फडणवीस यांच्या अनुभवाचा फायदा भाजपा जनतेसाठी करेल

व्हर्च्युअल रॅलीत कोकण विभागातून एक कोटी जनतेचा सहभाग

कणकवली | संतोष राऊळ 
७० वर्षात काँगेस ने काही बनविले नाही मात्र लॉकडाऊन च्या दोन महिन्यात प्रधानमंत्री मोदी यांनी निर्मिती क्षमता दाखवून दिली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि जनधन योजनेची सुरवात केली.३८ करोड जनतेचे बँक खाते सुरू झाले.त्यावेळी काँग्रेस ने टीका केली होती मात्र आज त्याच खात्यात २० हजार करोड जमा झाले.कॉग्रेस ने भारताच्या तिजोरीपासून गरिबांना दूर ठेवले होते. मात्र प्रधानमंत्री मोदी यांनी ती तिजोरी गरिबांसाठी खुली केली.८ करोड महिलांना उज्वला योजनेचा गॅस सुरू केला.कोरोना काळात तीन महिने मोफत गॅस दिला. काँग्रेसने अनेक घोषणा केल्या मात्र प्रतिपूर्ती कधीच केली नाही. अशी टीका व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करतांना केंद्रीय मंत्री सौ.स्मृती इरानी केली.
त्या म्हणाल्या किसान सन्मान योजनेतून ९ करोड ७५ हजार शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा केले.ज्या कोकणाने राष्ट्र निर्मितीच्या कार्यात,स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिले त्या कोकणावर निसर्ग वादळाचे संकट आले त्यात महाराष्ट्र सरकार मदत करण्यास अपयशी ठरले मात्र आपले दोन माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि देवेन्द्र फडणवीस यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन भाजपा जनतेला सर्वतोपरी मदत करेल असेही सौ.स्मृती इरानी यांनी सांगितले.
दोन माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत व्हर्च्युअल रॅलीत बोलण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य असे व्हर्च्युअल रॅलीच्या प्रमुख वक्त्या केंद्रीय मंत्री स्मृती इरानी भाषणाच्या सुरवातीलाच प्रतिपादन केले.कोरोना महामारीत काम केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले.
त्या म्हणाल्या, मुंबई च्या कोरोना रुग्णांची संख्या पाहून दरदिवशी लोक चिंतेत आहेत.मात्र जनतेने घाबरू नये भाजपा कार्यकर्ता तुमच्या सोबत आहे.कोरोना महामारीत काम करणाºया कर्मचाºयांसाठी ५० लाखाचा विमा केला आहे.त्यांना सर्व सुरक्षा दिली आहे.मुंबईचा नागरिक सोशल मीडियावर कोरोना विरोधात बोलल्यास कारवाई करता.
भाजपाने सहयोगी दलासह कॉग्रेस भ्रष्टाचार संपवू मात्र आज सत्तेसाठी आयुष्यभर विरोध करणारे काँग्रेस सोबत गेले मात्र आम्ही जनतेशी बांधील आहोत. भाजपा तातडीने जनतेशी जोडले जाणार असून त्यांचे प्रश्न सोडविणार आहोत.
या व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदी यांच्या सोबत कायम राहिलेल्या जनतेचे आभार मानने शक्य झाले.८० करोड जनतेला रेशन दिले. आघाडी सरकार कोणतेही काम करू शकले नाही तरी राज्यातच दोन माजी मुख्यमंत्री भाजपा सोबत आहेत.जनतेला न्याय देण्याचे काम राज्यात केले जाईल.
नितीन गडकरी यांच्या माध्यमातून छोट्या उद्योगांना चालना मिळेल.रेल्वेमंत्री पियुष गोयल तीन दिवस आव्हान महाराष्ट्र सरकारला करत होते.कॉग्रेस ही अशी राजकीय पार्टी आहे जी ३७० हटविण्यासाठी विरोध करते,आर्मीने कारवाई केली त्याचे पुरावे मागतात. हेच लोक जेव्हा निवडणूक आली तेव्हा हिंदुत्वाच्या विरोधात नसल्याचे सांगत होते.मात्र प्रधानमंत्री मोदी यांच्यावर विश्वास ठेवले आणि पुन्हा निवडून दिले.राहुल गांधी कधीच देशाच्या बाजूने उभे राहणार नाही.आज हीच मंडळी चायनाचे समर्थन करतात,पाकिस्तान सोबत मैत्री करतात.राजीव गांधी फाऊंडेशन मध्ये चीन देशातून पैसे घेतात.
भाजपाच्या तिसºया व्हर्च्युअल रॅलीचे दिल्ली,मुंबई व सिंधुदुर्ग-कणकवली या तीन केंद्रावरून प्रसारण करण्यात आले.सिंधुदुर्ग-कणकवली येथे प्रहार भवन येथील केंद्रातून माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे,विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री आ.रवींद्र चव्हाण,प्रदेश उपाध्यक्ष आ.प्रसाद लाड,भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,माजी आ. प्रमोद जठार,जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर आदी नेते मंचावर उपस्थित होते.
महाराष्ट्र जनसंवाद-व्हर्च्युअल रॅलीच्या सुरवातीला सीमारेषेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.विरोधीपक्ष नेते यांनी दिपप्रजवल करून या रॅलीचा शुभारंभ केला.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ दिली.तर आभार आ.प्रसाद लाड यांनी मानले.

जाहिरात4