गुहागर समुद्रकिनारील जेटी व व्ह्यु गॅलरी तोडण्याचे आदेश

जाहिरात-2
एमसीझेडएमए; राष्ट्रीय हरित लवादाकडे सुरु होती केस

गुहागर | प्रतिनिधी

शहरातील समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात आलेली जेटी, व्ह्यु गॅलरी आणि सीआरझेडचे उल्लंघन करुन केलेली बांधकामे तोडण्यात यावीत असे आदेश महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन समिती ( एमसीझेडएमए) ने दिले आहेत. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी आणि जिल्हा सागरी क्षेत्र व्यवस्थापन समिताला पाठविण्यात आले आहे.

एम.सी.झेड.एम.ए.च्या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर बांधलेल्या जेटी आणि व्ह्यु गॅलरी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन बांधण्यात आल्या आहेत. अशी तक्रार सुरु राष्ट्रीय हरित लवाद पुणे यांच्याकडे बळवंत परचुरे यांनी केली होती. या केसचा निकाल 16 मार्च 2019 ला लागला. त्यामध्ये सीआरझेडचे उल्लंघन झाल्याने ही अनधिकृत बांधकामे तोडून टाकावी असा निर्णय झाला आहे. त्यामुळे गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील जेटी आणि व्ह्यु गॅलरीचे बांधकाम तोडून त्या संदर्भातील अहवाल पाठवाव. तो राष्ट्रीय हरित लवादाकडे द्यायचा आहे.

सदर पत्र एम. सी. झेड. एम.च्या अधिकाऱ्यांनी 21 एप्रिल 2020 ला जिल्हाधिकारी आणि जिल्हा सागरी क्षेत्र व्यवस्थापन समितीला पाठविले आहे. कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे आजपर्यंत यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पावसाळा संपल्यानंतर जिल्हाधिकारी आणि समिती कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान सध्या पावसामुळे जेटीवर कोणीही जात नाही. गेली तीन वर्ष जेटीवरील प्रवेशाला सार्वजनिक बांधकाम विभागाने बंदी केली होती. तर व्हयु गॅलऱ्यांवर चढण्यासाठीच्या पायऱ्या गेल्यावर्षीच्या पावसात निखळल्या. त्यामुळे व्हयु गॅलऱ्याही विनावापर पडून आहेत. शिवाय व्हयु गॅलऱ्यांचा पायाही लाटांनी उखडला आहे.

अजून पर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसली तरी एमसीझेडएमच्या पत्राप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाही करावी लागेल. अन्यथा कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना उत्तर द्यावे लागेल.
बळवंत परचुरे (याचिकाकर्ते)

जाहिरात4