डीजीके महाविद्यालयाला साहित्य विषयक मानाचा करंडक 

जाहिरात-2
मुंबई विद्यापीठ 52 व्या युवा महोत्सव
रत्नागिरी |
मुंबई विद्यापीठांतर्गत 104 महाविद्यालयांच्या सहभागाचा 52 वा युवा महोत्सव सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पार पडला होता.संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला आणि साहित्य विषयक अशा पाच प्रकारात एकंदर 39 प्रकारच्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये साहित्यविषयात 09 गुणांसह प्रथम क्रमांक मिळवून भारत शिक्षण मंडळाच्या देव घैसास कीर कला वाणिज्य विज्ञान वरीष्ठ महाविद्यालयाने साहित्य विषयक अजिंक्यपदाचा चषक पटकावला. यावेळी त्यांनी मुंबई विद्यापीठाचे सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावलेल्या पोदार महाविद्यालयाला 1 गुणाने मागे टाकले.
या स्पर्धेतील मराठी वक्तृत्व या प्रकारात कु सिद्धी अरुण नार्वेकर  ( द्वितीय वर्ष कला) हिने “पाऊस, पाऊस, पाऊस…… ” या विषयावर आपले विचार मांडून सुवर्णपदक जिंकले. मराठी वादविवाद या स्पर्धेत कु सुप्रिया मिलिंद देसाई  ( तृतीय वर्ष कला) व कु कौस्तुभ हेमंत फाटक (तृतीय वर्ष कला) यांनी “भारतीय चित्रपट जागतिक दर्जाचा होऊ लागला आहे” या विषयावर विचार व्यक्त करून रौप्यपदक मिळविले.मराठी कथाकथन या प्रकारात कु कौस्तुभ हेमंत फाटक ( तृतीय वर्ष कला) याने “ताजमहाल ” ही कथा सांगून रौप्यपदक पटकावले.
साहित्य विषयक गटात 09 प्रकारात एकंदर 22 महाविद्यालयांनी किमान एक पदक मिळविले.अंतिम गुणवारीत बीएसएम -डीजीके 9 गुण ,पोदार महाविद्यालय व जोशी बेडेकर महाविद्यालय 08 गुणांसह द्वितीय स्थानी तर 06 गुणांसह तीन महाविद्यालये तृतीय क्रमांकावर राहिली.
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रभारी प्राचार्य प्रा सीएमए उदय बोडस ,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा दीपाली भाबल,  श्री महेंद्र पाटणकर, सौ मानसी चव्हाण,पटवर्धन हायस्कूलचे ग्रंथपाल श्री ओंकार मुळ्ये यांनी मार्गदर्शन केले होते. तीन वर्ष पूर्ण  झालेल्या महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठातील  साहित्य विषयक विभागाचा  चषक  जिंकला याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार साळवी,कार्याध्यक्ष दिनकरराव पटवर्धन,  उपकार्याध्यक्षा सौ.नमिता कीर,  देणगीदार श्री रमेश कीर व डाॅ सुभाष देव,कार्यवाह श्री सुनिल उर्फ दादा वणजू  व अन्य पदाधिकारी तसेच घटक संस्थांचे प्रमुख व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
जाहिरात4