Corona Updates : रत्नागिरी ११ नवे पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

Coronavirus economic impact concept image
जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी

मिरज होऊन आता प्राप्त झालेल्या अहवालातील 11 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. आज एका महिला रुग्णाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याने रत्नागिरीतील एकूण मृतांची संख्या चार झाली आहे.

आता रत्नागिरीत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२४ झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गुरुवारी रात्री नव्याने आलेल्या अहवालात ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण पॉझिटिव चा आकडा १२४ इतका झालेला आहे . यातील १० रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत. तर अन्य रुग्ण कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्स आहे.

दरम्यान रत्नागिरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एका महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जाहिरात4