रस्त्याने ओरडता का अशी विचारणा केल्याने मारहाण; गिम्हवणे येथील प्रकार

जाहिरात-2

जालगांव | वार्ताहर

रस्त्याने रात्रीचे जाताना ओरडत का जाता याची विचारणा केल्याचा राग एका टोळक्याला येऊन त्यांनी हा प्रश्न विचारणाऱ्याला मारहाण केली, हा प्रकार काल रात्री गिम्हवणे येथे घडला.

या बाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल (ता.20) रोजी रात्री 9.45 चे सुमारास गिम्हवणे सहकार नगर येथील सचिन सावंत व संजय झगडे हे त्यांचे मित्र उदय झगडे यांना घरी सोडून परत येत असताना गिम्हवणे येथील भैरी मंदिर ते तेलीवाडी रस्त्याने समोरून 5 जण आरडा ओरड करत येत होते, त्यांना संजय झगडे यांनी कारे ओरडता असे विचारले असता त्याचा राग येऊन सचिन झगडे याने अंगावर धावत जाऊन त्यांच्या डोक्यात बांबू मारला तर सुशांत झगडे, स्वप्नील झगडे, केतन झगडे, ओंकार झगडे यांनी सचिन सावंत यांना जमिनीवर पाडून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार सचिन सावंत यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली असून या तक्रारीनुसार पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास हेड कॉन्स्टेबल वैशाली सुकाळे करीत आहेत.

जाहिरात4