ज्याची वाट पाहत होते रत्नागिरीकर ‘ते’ घडले 18 दिवसानंतर….

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी

तब्बल अठरा दिवसानंतर सोमवारी दिवसभर आणि मंगळवारी संध्याकाळ पर्यंत जिल्हयात एकाही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण ची नोंद झाली नाही. तर एकूण 92 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 33 जणांनी कोरोनावर मात करत बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 56 जणांवर उपचार सुरु असून तेही लवकरच घरी परततील असा विश्‍वास त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी व्यक्‍त केला आहे.

देशभर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात दहा ते बारा रुग्ण सापडले होते. ते बरे होऊन एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात घरीही गेले होते. त्यामुळे रत्नागिरीकर निर्धास्त होते. परंतु मे महिन्याच्या 3 तारखेनंतर जिल्ह्यात चाकरमान्यांची संख्या वाढू लागली आणि त्याचबरोबर कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्याही वाढत होती. मागील पंधरा दिवस दरदिवशी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडत असल्याने, सगळीकडे भीतीचे वातावरण होते. यामुळे चाकरमानी व ग्रामस्थ असे निर्माण होण्याची शक्यता झाली होती. मात्र प्रशासनाने ग्रामस्थांमध्ये जागृती करीत चाकरमान्यांना दूर लोटू नका असा सल्‍ला दिला. सध्या चाकरमान्यांना होम  क्‍वारंटाईन करण्यावर भर दिला जात आहे.
स्क्रिनिंगमध्ये संशयास्पद आढळलेल्या किंवा स्वॅब घेतलेल्यांना संस्थात्मक क्‍वॉरंटाईन करण्यात आले आहे. तब्बल साडेचार हजारहून अधिक चाकरमान्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील चार हजार निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 92 रुग्ण पॉझिटीव्ह सापडले आहेत. त्यातील अनेकजण बरे झाले आहेत. मागील दोन दिवसापर्यंत 17 रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. मात्र मंगळवार हा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसाठी शुभवार ठरला आहे. मंगळवारी तब्बल 16 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील 15 तर खेड कळंबणी रुग्णालयातील एका रुग्णाचा समावेश आहे. या सर्वांना होम क्‍वॉरंटाईन केले जाणार असून, त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवले जाणार आहे. मंगळवारी जिल्हा रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये एका नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचाही समावेश आहे. त्यामुळे आतापर्यत दोघींना घरी सोडण्यात आले असून, दोघींवर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात सध्या 56 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात उपचार सुरु असणारे रुग्णही लवकरच बरे होऊन घरी परततील असा विश्‍वास आरोग्य यंत्रणेने व्यक्‍त केला आहे.

जाहिरात4