परप्रांतीयांनी भरलेला ट्रक पकडला : झाराप-पत्रादेवी बायपासवर झिरो पॉईंटवर कारवाई

जाहिरात-2

सावंतवाडी | प्रतिनिधी
गोवा व सिंधुदुर्गातून ट्रक मधून परजिल्ह्यात जाणाऱ्या ७० हून अधिक परप्रांतीय कामगारांना झाराप-पत्रादेवी बायपास वरील झिरो पॉईंट येथे ताब्यात घेण्यात आले. हा ट्रक जप्त करून सर्व कामगारांसह सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आला.

त्यानंतर त्यांना तहसील कार्यालयात पाठविण्यात आले असून तेथे पुढील कारवाई सुरू आहे. याबाबत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. दरम्यान एवढ्या मोठ्या संख्येने हे परप्रांतीय कामगार नेमके कुठे जात होते याबाबत अधिक तपशील प्राप्त होऊ शकला नाही.

जाहिरात4