भगवान परशुराम जयंतीदिनी जगभरातल्या भाविकांनी घेतले ‘फेसबुक लाईव्ह’ च्या माध्यमातून दर्शन

चिपळूण । वार्ताहर

कोकणच्या देवभूमीची निर्मिती करणा-या चिरंजीव अवतार असणा-या भगवान परशुरामांचा चिपळूणनजिकच्या परशुराम मंदिरात शनिवारी जन्मोत्सव झाला. दरवर्षी जन्मोत्सव फार थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी कोवीड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर उत्सव साजरा केला जाणार नाही असे विश्वस्त समितीने ठरविले आणि केवळ पूजा करून परशुरामांच्या भक्तांना लाईव्ह परशुराम दर्शनाची व्यवस्था करून देण्यात आली.

दरवर्षी परशुराम याग, आरत्या, फे-या, कीर्तन, नाटक, गायनाची बैठक अशा प्रकारचे वेगवेगळे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केले जातात. यावर्षी हे सर्व कार्यक्रम रद्द करून व्यवस्थापन समितीने केवळ पूजा करून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दर्शनाची सोय भक्तांना उपलब्ध करून दिली. फेसबुकलाईव्ह दर्शन महाराष्ट्र, देशातूनच नव्हे तर परदेशातील इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलियातील भक्तांनी घेतले. फेसबुक लाईव्हला प्रचंड प्रतिसाद दिला.

जाहिरात4