क्रिकेटर घडावेत यासाठी मोफत प्रशिक्षण,हा आ.नितेश राणे यांच्या स्तुत्य उपक्रम : अजित तेंडुलकर

जाहिरात-2

सचिन तेंडुलकरचे गुरु अजित तेंडुलकर यांनी केले आ.नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या विनोद कांबळी अकादमीचे केले कौतुक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून क्रिकेटर घडावेत यासाठी मोफत प्रशिक्षण दिलेजाते हा आम.नितेश राणे यांच्या स्तुत्य उपक्रम

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेट साठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त बना.

कणकवली (संतोष राऊळ)

विनोद कांबळी क्रिकेट ॲकॅडमी हेच फार मोठे नाव आहे. स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ॲकॅडमीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून क्रिकेटर घडावेत यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते ही अभिमानास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा स्वतःचे करिअर घडवण्यासाठी पुरेपूर वापर करून घ्यावा. पाच दिवसाची क्रिकेट मॅच,ट्वेंटी-ट्वेंटी किंवा आयपीएल साठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त बना. या ठिकाणी असलेल्या सेवा-सुविधा आणि मिळालेल्या नामवंत प्रशिक्षकांकडून जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करून घ्या. प्रत्येक दिवशी आपण कोणत्या पद्धतीचा खेळत करणार हे निश्चित करूनच दिवसाची सुरुवात करा.राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्थरावरील प्रत्येक क्रिकेटरच्या खेळाचे निरीक्षण करा. त्यांच्या खेळातील बारकावे आत्मसात करा आणि सरावात सातत्य ठेवा. सचिन तेंडुलकर,विनोद कांबळी यांच्यासारख्या क्रीडापटूंना जे यश मिळाले ते यश तुम्हा प्रत्येक खेळाडूला मिळेल असा विश्वास सचिन तेंडूलकर चे दुसरे गुरु व त्यांचे बंधू अजित तेंडुलकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना व्यक्त केला. यावेळी आमदार नितेश राणे यांनी अजित तेंडुलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
अजित तेंडुलकर यांचे सोबत जगदीश आणि रणजित पाटील, ऋषी भावे,कोच महाले सर,आदी मान्यवर प्रशिक्षक उपस्थित आहेत.अजित तेंडुलकर म्हणालेत प्रशिक्ष महाले सर यांचे मार्गदर्शन तुम्ही कायम लक्षात ठेवा.उद्धिष्ट निश्चित करून खेळा,आवडत क्रिकेट पटू एक असला तरी सर्वच क्रिकेटपटूचा खेळ पहा, प्रत्येक खेळाडूच्या खेळाचे वेगळेपण आहे ते आत्मसात करा.एवढ्या ग्रामीण भागात विनोद कांबळी क्रिकेट अकादमी सुरू आहे याचा अभिमान आहे.या अकाडमीतून १६ वर्षा खालील गटात राज्य स्थरावर खेळाडू निवडले गेले याचे मला समाधान वाटते.जिल्हा स्थरावर या अकाडमितील खेळाडूनिवडले गेलेत ते जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात याचा गर्व वाटतो अशा शब्दात विनोद कांबळी अकाडमितीच्या यशाचे कैतुक केले.

जाहिरात4